बिग ब्रेकिंग:पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील साखर कारखान्यावर छापा

बीड जिल्ह्यात राजकीय खळबळ 

परळी वैद्यनाथ: Pankja gopinath Munde news भाजप नेत्या माजी मंत्री सौ.पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने छापा टाकला आहे.

परळी वैजनाथ तालुक्यातील तथा परळी विधानसभा मतदासंघातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आहे.सदर कारखाना पंकजा मुंडे यांच्या ताब्यात आहे. या साखर कारखान्यावर आज सकाळपासून कारवाई होत आहे. जीएसटी थकवल्या प्रकरणी जीएसटीचे अधिकारी हे सकाळी दहा वाजल्यापासून वैधनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये चौकशी करत आहेत, अशी माहिती मिळत आहे.नेमक्या कोणत्या प्रकरणात ही चौकशी होतेय? याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. मात्र जीएसटीचे अधिकारी सकाळपासून वैजनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयात चौकशी करत आहेत.

 

कार्यकर्ते अस्वस्थ

भाजपचे दिग्गज नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तथा सत्ताधारी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांच्यावर जीएसटीच्या या कारवाईने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पंकजा मुंडे यांच्यावर भाजपकडून सतत अन्यय होत असल्याची तक्रार त्यांचे कार्यकर्ते करत असतात. प्रत्येक वेळी त्यांना डावलले जात आहे असं म्हटलं जातं. मात्र, जीएसटी कर थकवल्याप्रकरणी ही कारवाई झाली असल्याचे बोलले जात असले तरीही यात अजून सविस्तर माहिती समोर आलेली नाही.

बहीण-भावाचे राजकीय वैर संपले?

भगवान गडाच्या पायथ्याशी नुकत्याच पार पडलेल्या सप्ताहाच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे व त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी आपल्यातील राजकीय वर संपल्याचे घोषित केले होते. या कार्यक्रमात बोलताना भगवानगडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी ‘पंकजाने अहंकार सोडावा’ असे म्हटले होते.त्यावर पंकजांनी आपल्यात कसलाही अहंकार नाही, माझी उंची आणि आवाज मोठा आहे! असे प्रत्युत्तर त्यांना दिले होते. बहिण भावांनी आपसातील राजकीय वैर संपल्याची घोषित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पंकजा यांच्या कारखान्यावर धाड पडल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Reply