शाहरुखचा ‘पठाण’ पहिल्याच दिवशी ऑनलाईन लीक…

 

या’ साईटवर झाला लीक

मुंबई : अभिनेता शाहरुख खान , जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्या प्रमूख भुमिका असलेला ‘पठाण’ सिनेमा आज (२५ जानेवारी)रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. पण प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सिनेमाला मोठा झटका लागला आहे. रिपोर्ट्सनुसार, सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. प्रदर्शनापूर्वीच सिनेमा लीक झाल्यामुळे निर्मात्यांना मोठा झटका लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगोदरच बॉयकॉट मोहिमेमुळे अडचणीत आलेला हा सिनेमा लिक झाल्यामुळे जास्तच अडचणीत आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार तमिळ रॉकर्स, फिल्मझिला, Mp4 मूव्हीज आणि व्हेगामोव्हीज इत्यादी सारख्या साइट्वर पठाण सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. या साइट्सवर सिनेमाची एच डी प्रिंट पहायला मिळत आहे. याआधी देखील अनेक सिनेमे ऑनलाईल लीक झाल्यामुळे निर्मात्यांना मोठं नुकसान झालं होतं. सिनेमा ऑनलाईन लीक झाल्यानंतर प्रेक्षक थिएटरमध्ये जाण्या ऐवजी घरी बसून मोफत सिनेमा पाहणे पसंद करतात.‘पठाण’ सिनेमातील ‘बेशर्म रंग’ गाण्यावर होणारा विरोध पाहता सेंसर बोर्डाने सिनेमातील काही सिनवर कात्री चालवली असून सिनेमात महत्त्वाचे बदल केले आहेत.

 

दरम्यान, शाहरुख खान हा हिंदु धर्म विरोधी असल्याचा दावा करत भारतातील मोठया वर्गाने पठाण वर बहिष्कार टाकला आहे. यासाठी सोशल मीडियावर #Boycotpathan या hashtag ने बॉयकॉट मोहिमे सुरु केलेली आहे. बॉयकॉट मोहिमेमुळे आमिर खान चा लालसिंग चढ्ढा सिनेमा फ्लॉप गेला होता. पठाण ला फ्लॉप होण्यापासून वाचवण्यासाठी शाहरुख खान फॅन क्लब चे नावाखाली स्वतः थिएटर्स बूक करत असल्याच्या चर्चा आहेत. बॉयकॉट मोहिम व एच डी प्रिंट लीक झाल्यामुळे ‘ पठाण ‘ फ्लॉप होतो की हिट होतो हे येणारा काळच ठरवेल.

Leave a Reply