असा करा अर्ज; Pcmc recruitment 2023
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील शिक्षण विभागात सहाय्यक शिक्षक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून त्यासाठी उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरच्या जागा या एकत्रीत मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहेत.
किती जागा भरणार?
मराठी व उर्दू माध्यमासाठी सहाय्यक शिक्षक पदांच्या २०९ जागा भरण्यात येणार आहेत.
काय आहे शैक्षणिक पात्रता ?
पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचा.
किती मिळेल वेतन?
भरण्यात येणारे जागा तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार असल्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना एकत्रित मानधन २७,५००/- (सत्तावीस हजार पाचशे रुपये) दरमहा मिळतील.
येथे करा अर्ज–
महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या अर्जाच्या विहीत नमुन्यातच अर्ज करायचा आहे. सदरचा अर्ज घेऊन उमेदवारांनी ०१/०६/२०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत थेट खालील पत्त्यावर आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहायचे आहे.
पत्ता-
दिनदयाळ माध्यमिक विद्यालय, संत तुकारामनगर,जुना मुंबई पुणे रस्ता, पिंपरी, पुणे- १८
मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी 👇 क्लीक करा
https://drive.google.com/file/d/1yqqLEcPqmFzcG3c8bjcIg8kZ-D1aa9md/view?usp=drivesdk