प्रभू श्रीरामाच्या नित्य पूजेसाठी एस.सी. व ओबीसी प्रवर्गातूनही पुजाऱ्यांची निवड

अयोध्या

 

येत्या 22 जानेवारी रोजी प्रभु श्रीरामाच्या भव्य मंदिराचा लोकार्पण सोहळा आहे.या सोहळ्यासाठी अयोध्या नगरी नटली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू  श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न होणार आहे.प्रभू श्रीरामाच्या नित्य पूजेसाठी एकूण 24 पुजाऱ्यांची निवड झाली असून या 24 पुजाऱ्यांपैकी तीन पुजारी अनुसूचित जाती जमाती व एक पुजारी ओबीसी प्रवर्गातून असल्याची माहिती समोर आली आहे.

 

प्रभू श्रीराम हे सर्वांचेच आहेत कोणत्याही एका जातीचे नाहीत प्रत्यक्ष प्रभू श्रीरामाच्या आयुष्यामध्ये आपल्याला समरसता दिसते रामाने कधी जातीभेद वर्णभेद अथवा कोणताही उच्च नीचतेचा भेद पाळलेला नाही प्रभू श्रीरामाचे जीवन चरित्र समरसतेचे मूर्तीमंत उदाहरण आहे.येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत साकार होत असलेल्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरात प्रभू श्रीरामाच्या नित्य पूजेसाठी एकूण 24 पुजाऱ्यांची निवड करण्यात आली ही निवड प्रक्रिया खूप कठोर व अवघड होती.देशभरातून निवडलेल्या 24 पुजाऱ्यांना तीन महिने खडतर प्रशिक्षण दिले जाणार असून या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना मोबाईल वापरण्याची बंदी असून प्राचीन काळी गुरुकुलामध्ये ज्या प्रकारे शिक्षण दिल्या जायचे त्याचप्रमाणे निवड झालेल्या 24 पुजाऱ्यांच्या प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे.यात विशेष बाब म्हणजे सर्व पुजारी केवळ ब्राह्मण प्रवर्गातील नसून 24 पुजारांपैकी तीन पुजारी अनुसूचित जाती जमाती व एक पुजारी ओबीसी प्रवर्गातील असल्याचे समोर आले आहे.मंदिरात ब्राह्मणे तर पुजारी नेमण्याची ही काही पहिलीच वेळ नसून बाबरी मशिदीच्या पतनानंतर अस्थाई स्वरूपात टेन्ट मध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती ते  पुजारी महंत सत्येंद्र दास हे ओबीसी प्रवर्गातून होते.

दक्षिण भारतातील मंदिरामध्ये आजही 70% पुजारी हे ब्राह्मणेतर असून महाराष्ट्रातील तुळजापूर व पंढरपूर येथील मंदिरात ब्राह्मणेतर पुजारी दिसून येतात दरम्यान प्रभू श्रीरामाच्या मंदिर लोकार्पण समारंभात समरसतेचे चांगले उदाहरण समाजासमोर मंदिर समितीने ठेवल्याचे दिसत आहे

 

Leave a Reply