कैकाडी व एस.सी समाजातील दाम्पत्यांच्या हस्ते श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा व महापूजा

 

प्रतिनिधी

अयोध्या येथे येत्या 22 तारखेला श्री राम प्रभूंची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे यासाठी महाराष्ट्रातील कैकाडी समाजातील महादेव गायकवाड व अनुसूचित जातीतील विठ्ठल कांबळे या दांपत्यांच्या हस्ते आयोध्या येथे श्रीराम प्रभूंची प्राणप्रतिष्ठा व महापूजा होणार आहे

22 जानेवारी रोजी श्रीराम प्रभूंची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे यासाठी देशभरातून 11 दापत्यांची निवड करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील दोन दापत्यांचा समावेश आहे यात संघाचे शताब्दी विस्तारक महादेव गायकवाड व कोकण विभागाचे कार्यवाहक विठ्ठल कांबळे यांची सपत्नीक निवड करण्यात आली आहे.
महादेव गायकवाड हे मूळचे काक्रंबा जिल्हा धाराशिव येथील रहिवासी असून ते सेवानिवृत्त शिक्षक आहेत 1990 पासून ते संघाशी जोडले गेले आहेत.दिनांक 21 जानेवारी रोजी ते आयोध्येत पोहोचणार असून 22 तारखेच्या कार्यक्रमात ज्या 11 दापत्यांच्या हस्ते श्रीराम प्रभूंची प्राणप्रतिष्ठा व महापूजा होणार आहे त्यात या दोघांचा समावेश आहे.यापूर्वीही पुजाऱ्यांच्या निवडीमध्ये ओबीसी व अनुसूचित जाती जमाती मधून निवड करण्यात आली आहे.

Leave a Reply