आ.प्रकाश सोळंके व रमेश आडसकरांकडून श्रेयासाठी पत्रकबाजी

 

माजलगाव दी 14 प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत माजलगाव मतदारसंघासाठी चाळीस कोटींचा निधी मंजूर झाल्याचे समजताच आमदार प्रकाश सोळंके व भाजप नेते रमेश आडसकरांनी पत्रक काढून निधी आम्हीच आणल्याचा दावा केला आहे. दरम्यान दोघांच्याही दाव्याने नेमके श्रेय कुणाला दयावे असा जनतेत पेच निर्माण झाला आहे.

पंतप्रधान ग्रामसडक योजना ही केंद्र सरकारची योजना असते या योजनेअंतर्गत गावखेड्यातील प्रमुख जिल्हा मार्गांची दुरुस्ती करण्यात येत असते या अंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याचा आराखडा बनवण्यात येत असतो या प्रक्रिये दरम्यान आमदार व खासदारांनी शिफारस केलेल्या रस्त्यांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात येऊन राज्य व केंद्र सरकार या कामांना मंजुरी देत असते कोणत्या लोक प्रतिनिधींनी शिफारस जरी केली नाही तरी पी. एम. जी. एस. वाय खात्यांतर्गत प्रत्येक तालुक्यात आराखड्या प्रमाणे निधी मिळतच असतो.परंतु काल माजलगाव, धारूर, व वडवणी तालुक्यात निधी मिळाल्याची माहिती मिळताच सोळंके व आडसकरांनी पत्रक काढून आम्हीच निधी आणल्याचे जाहीर करत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.दोन्ही गटांच्या पत्रकबाजी मुळे जनसामन्यात नेमकं श्रेय कुणाला दयावे यावरुन प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या दोन्ही नेत्यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन त्यांनी केलेला पाठपुरावा व पत्रव्यवहार जाहीर करावा अशी मागणी जनसामान्यातुन होताना दिसत आहे.दरम्यान मतदारसंघातील माजलगाव, धारूर व वडवणी भाजप तालुकाध्यक्षांनी अजून एक पत्रक काढत प्रकाश सोळंकेनी आयत्या पिठावर रेघा मारू नये असे सांगितले आहे.

Leave a Reply