डॉ.प्रा.आर.एम.धायगुडे यांची विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड विभाग येथे नियुक्ती

वडवणी(प्रतिनिधी): माणूस जन्माला आल्यानंतर तो कसा जगला यापेक्षा त्याने जीवनामध्ये किती संघर्ष केला आणि किती प्रमाणात यश संपादन केलं याला फार महत्त्व दिले जातं त्याचबरोबर सर्वसामान्य कुटुंबातून व अतिशय संघर्ष करत अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गणित विषयासारख्या अवघड विषयात मास्टर ऑफ फिलॉसॉफी व तदनंतर डॉक्टर ऑफ फिलोसोफी करून प्रथम कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बदनापूर येथे प्रपाठक म्हणून नियुक्ती झाली व त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे प्रपाठक म्हणून नियुक्ती झाली व त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत त्यांची असोसिएट प्रोफेसर म्हणून अमरावती येथील ज्ञान-विज्ञान शासकीय विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या ठिकाणी नियुक्ती झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी पीएचडी पदवी संपादन केली आहे.

दरम्यानच्या काळात अमरावती विभागाचे जॉईंट डायरेक्टर म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे यापूर्वी त्यांनी काम पाहिले होते. परत शासनाकडून त्यांची नांदेड विभागीय जॉईंट डायरेक्टर म्हणून नुकतीच नियुक्ती झाली. खरोखरच हा प्रवास म्हणजे खेडोपाड्यातील आणि छोट्या छोट्या गावातील विद्यार्थ्यांसाठी एक आदर्शच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एक आदर्श घेत जिद्द चिकाटी आणि मेहनत केली पाहिजे त्यामुळे जीवनामध्ये परिस्थिती कशीही असली तरी जिद्द,चिकाटी,मेहनत,सातत्यता कायम या गुणामुळे बिकट परिस्थितीवर मात करून यश संपादन करता येते हे डॉ. प्रा. रामकृष्ण माणिकराव धायगुडे यांनी दाखवून दिले आहे अतिशय संघर्षशील जीवनामध्ये त्यांनी संघर्ष करत हे यश संपादन केले आहे त्यांच्या या यशाबद्दल नियुक्ती बद्दल त्यांचे सामाजिक राजकीय विविध क्षेत्रातून कौतुक होत आहे.

Leave a Reply