खा. प्रीतम मुंडेंकडून मोदी सरकारला घरचा आहेर

बीड लोकसभेच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी दिल्लीत खेळाडूंच्या आंदोलनावरून मोदी सरकारला घरचा आहेर दिला असून खेळाडूं सोबत संवाद साधला गेला नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

दिल्लीत खेळाडू मागील महिनाभरा पासून आंदोलन करीत असून या मुद्द्यावरून मोदी सरकारला विरोधकांनी चांगलेच घेरले आहे आता दस्तुरखुद्द भाजपच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी या प्रकरणावरून बीड येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर खंत व्यक्त करीत आंदोलन करणाऱ्या खेळाडूं सोबत केंद्र सरकारकडून कोणताही संवाद साधला गेल्या नसल्याने मान्य केले आहे. खा. प्रीतम मुंडे या भाजपच्या खासदार असून त्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस सहित विरोधकांनी मोदी सरकारवर केलेल्या टीकेला एकप्रकारे पाठबळ मिळाले आहे.दरम्यान या प्रकरणावरून भाजपकडून अद्याप कोणतीही स्पष्टीकरण आले नसून या मुद्यावरून राजकारण चांगलेच तापणार असे
दिसत आहे.

Leave a Reply