पुढील चार दिवस मुसळधार पावसाचे; 9 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता

महाराष्ट्राच्या वातावरणात सातत्याने चढ-उतार पहायला मिळत आहे. कधी तापमानाचा पारा अचानक वाढतो तर कधी पारा घसरुन चक्क अवकाळी पाऊस बरसत आहे.
आता राज्यातील काही भागांत अवकाळी पाऊस बरसणार आहे. पुढील चार दिवस राज्यातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह वादळ तसेच पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

कोकण पासून ते विदर्भापर्यंत पाऊस बरसणार

राज्यात पुढील चार दिवस म्हणजेच 16 मार्च ते 19 मार्च या काळात राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खासकरुन दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे वाहण्याची दाट शक्यता आहे.
मुंबईत धुके

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईत सकाळच्या वेळी धुके असण्याची आणि दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळी आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33 अंश सेल्सिअस आणि 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

9 जिल्ह्यांत अवकाळी पाऊस

काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका पाऊस आणि 30-40 किमी प्रति तास वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये सोलापूर, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळचा समावेश आहे.

Leave a Reply