पुणे – मुंबईचं अंतर होणार कमी…

मुंबई: जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गांतर्गत ‘मिसिंग लिंक’ (Missing Link Project) हा प्रकल्प बांधण्यात येत आहे. हा प्रकल्प देशात पथदर्शी ठरणार असून लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरू शकतो.डिसेंबर २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास येईल, अशी शक्यता आहे.

‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे काम अतिशय आव्हानात्मक होतं. लोणावळा तलावाच्या तळाखाली जवळपास ५०० ते ६०० फूट अंतरावर हा बोगदा आहे. बोगद्याची लांबी ८ किमी असून जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा बोगदा बांधण्यात येत आहे. बोगद्याची रुंदी २३.७५ मीटर आहे. देशातीलच नव्हे, तर जगातील सर्वाधिक रुंदीचा हा बोगदा आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे अंतर अर्ध्या तासाने कमी होणार आहे. तसेच अपघातसंख्येत मोठी घट होईल, असे तज्ञांचे मत आहे.

या प्रकल्पामुळे प्रवास सुखकर होणार आहे. वाहतूककोंडी कमी होईल. त्याशिवाय प्रदूषण कमी होणार आहे. दरडी कोसळू नयेत, यासाठी सर्वत्र ‘रॉक बोल्ट’ करण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बाहेर जाण्यासाठी प्रत्येक ३०० मीटरवर एग्झिट मार्ग तयार करण्यात आले आहेत, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांतर्गत लोणावळा (सिंहगड संस्था) ते खालापूर पथकर नाक्यापर्यंत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची क्षमतावाढ करण्याचं काम सुरू आहे.

Leave a Reply