राहुल गांधी यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ भारतीय काँग्रेस करणार सत्याग्रह आंदोलन

राहुल गांधी यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ भारतीय काँग्रेस करणार सत्याग्रह आंदोलन

महविकास आघाडी सह समविचारी पक्ष संघटना होणार सामील

माजलगाव (प्रतिनिधी ): खासदार राहुल गांधी यांच्या संसदीय सदस्यत्वाच्या निलंबनाच्या निषेधार्थ आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट,शेकाप , माकप, मानवी हक्क अभियान,पी आर पी कवाडे गट,बहुजन विकास मोर्चा ,एम आय एम, यांच्या सह समविचारी पक्ष संघटना यांची संयुक्त बैठक माजलगाव शहरातील शासकिय विश्रामगृह येथे संपन्न झाली .

या महत्त्वपूर्ण बैठकीत खासदार राहुल गांधी यांच्या संसदीय सदस्यत्वाच्या निलंबनाच्या निषेधार्थ व भारतीय संविधान व लोकशाही यांचे संरक्षण करण्यासाठी बेमुदत सताग्रह आंदोलन करण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला.तसेच देशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांची अघोषित आणीबाणी लादली जात असून ,लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सर्वसामान्य माणसाला या सत्याग्रह आंदोलनात सहभागी करून घेण्याचा एकच सुर दिसून आला .तसेच हे बेमुदत सत्याग्रह आंदोलन सोमवार ता.२७ रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकाळी ११ते सायंकाळी १० वाजेपर्यंत बेमुदत केले जाईल याची माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली .यावेळी या महत्त्वपूर्ण बैठकीस अप्पासाहेब जाधव , कॉ.मुसद्दिक बाबा ,दयानंद स्वामी , जयदत्त नरवडे,राजेश घोडे,नारायण होके ,दत्ता कांबळे,हरिभाऊ सोळंके, ॲड.नारायण गोले,अफरोज तांबोळी ,भाई लहू सोळंके ,अमित नाटकर ,अशोक नरवडे,रशीद शेख ,राकेश साळवे,प्रदीप तांबे सह भारतीय काँग्रेस व महावी आघाडी सह मित्र पक्ष व समविचारी संघटनाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply