असा करा अर्ज…
Vehicle Registration for Sand Transporting
पुणे: वाळूच्या लिलाव पद्धतीमुळे वाळूचे दर हे गगनाला भीडले होते. सर्वसामान्य नागरिकांना वाळू खरेदी करणे जिकरीचे झाले होते. या सर्व बाबी शासनाच्या नजरेस आल्यामुळे शासनाने १ मे पासून नवीन वाळू धोरण New sand policy अमलात आणली असून यापुढे या धोरणामुळे नागरिकांना स्वस्तात घरपोच वाळू उपलब्ध होऊ शकणार आहे. ज्यांना या योजनेअंतर्गत वाळू वाहतूकदार म्हणून सहभागी व्हायचे आहे, त्यांच्यासाठी वाहनांची नोंदणी सुरू झाली आहे आज आपण या थोडक्यात पण महत्त्वाच्या माहितीमध्ये वाहनाची नोंदणी कशी करायची, हे जाणून घेणार आहोत.त्यासाठी खालील माहिती शेवटपर्यंत वाचा…
नागरिकांना स्वस्तात म्हणजेच ६०९ रूपये ब्रास घरपोच वाळू उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने वाहनांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या वाहनधारकांना आपले वाहन जसे की टिप्पर,ट्रॅक्टर व तत्सम प्रकारचे वाहन वाळू वाहतुकीसाठी शासनाकडे लावायचे आहे, अशा वाहन मालकांनी यासाठी आपल्या वाहनाची नोंदणी करावयाची गरज आहे.
जीपीएस बंधनकारक: GPS system required
जे वाहन आपण वाळू वाहतुकीसाठी नोंदणी करायचे आहे, अशा वाहनांमध्ये जीपीएस सिस्टम बसवलेली असणे किंवा बसून घेणे गरजेचे आहे. कारण वाळू वाहतुकी दरम्यान वाहनाचे करंट लोकेशन जाणून घेण्यासाठी शासनाने ही अट यामध्ये समाविष्ट केलेली आहे. त्यामुळे वाहन मालकांनी आपल्या वाहनास जीपीएस असल्याची खात्री करून घ्यावी.
अशी करा वाळू वाहतूकदार नोंदणी:
वाळू वाहतूकदार नोंदणी ची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.
१) सर्वात अगोदर गुगल क्रोम किंवा मोजीला फायरफॉक्स मधून महाराष्ट्र शासनाच्या महा खनिज या वेबसाईटला भेट द्या. वेबसाईट ची लिंक पुढे देत आहोत.
https://mahakhanij.maharashtra.gov.in/
२) महा खनिज साईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला विविध पर्याय दिसू लागतील, त्यात वाळू बुकिंग या ऑप्शन वरती क्लिक करा.
३) आता यामध्ये विविध पर्याय दिसू लागतील. त्यातील वाळू वाहतूकदार हा पर्याय निवडा. हा पर्याय निवडल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल त्यात तुमची माहिती भरून खाते तयार करा. तुम्ही तयार केलेला युजर आयडी व पासवर्ड जपून ठेवा.
४) पुढे मागणी केल्याप्रमाणे तुमची संपूर्ण माहिती त्यात भरा. जसे की मोबाईल नंबर,ई-मेल आयडी, तुमचे संपूर्ण नाव, जील्हा, तालुका,गाव इत्यादी.
५) आता याच वेबसाईट वर लॉग इन करा. लॉगिन केल्यानंतर वाहन जोडा या पर्यावर क्लिक करून तुमच्या वाहनांची सर्व माहिती जशी की वाहन क्रमांक, वाहनांचे फोटो इत्यादी माहिती भरून अर्ज सबमिट करा.
अशा पद्धतीने आपण वाळू वाहतूकदार होण्यासाठी आपल्या वाहनाची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सहज- सोप्या पद्धतीने करू शकतो. आपल्याला ही माहिती आवडली असल्यास आपण आपल्या मित्रांना,नातेवाईकांना शेअर करू शकता. अशाच नवनवीन सरकारी योजना, नोकरी अपडेट व रोखठोक बातम्यांसाठी वाचत रहा महा जागरण
Maha Jgaran mahajagran news portal
बातमी नव्हे तथ्य
आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये अवश्य सहभागी व्हा. लिंक 👇