समान नागरी कायदा हा राज्याच्या हिताचा निर्णय!

समान नागरी कायदा हा राज्याच्या हिताचा निर्णय!

सातारा (प्रतिनिधी): समान नागरी कायदा हा राज्याच्या हिताचा निर्णय असेल असे मला वाटते.समान नागरी कायद्याबाबत भूमिका मांडताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले,‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे हित समोर ठेवून अनेक निर्णय घेतले. यामध्ये काश्मीरमधील ३७० कलम हटविण्याची अनेक वर्षांचीही मागणी होती. समान नागरी कायदा हा राज्याच्या हिताचा निर्णय असेल असे मलाही वाटतंय. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे.’’ असे मत त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

आपण ज्या राजघराण्यात जन्मलो आहोत, त्या घराण्यातील कार्यक्रमाला जायला निमंत्रण कशाला लागते? प्रतापगडावरील देवस्थान जर आपल्या मालकीचं असेल तर मुख्यमंत्र्यांच्या फोनची वाट बघायची गरज काय, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंच्या वक्तव्यावर केली.

प्रतापगडावर शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमास खासदार उदयनराजे उपस्थित नव्हते. त्याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून उशिरा निमंत्रण मिळाल्याचं सांगत पालकमंत्र्यांसह इतर कोणाचाही आपल्याला फोन आला नसल्याचं सांगितलं होतं. त्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंवर टीका केली.आपण ज्या घराण्यात जन्मलो आहे, त्या घरातील कार्यक्रमाला जायला निमंत्रण कशाला लागते? प्रतापगडावरील देवस्थान जर आपल्या मालकीचे असेल तर मुख्यमंत्र्यांच्या फोनची वाट बघायची गरज काय, अशी टीका शिवेंद्रसिंहराजेंनी केली.

Leave a Reply