समृद्धी महामार्ग अन् उद्धव ठाकरेंची बदलती भूमिका
मुंबई (प्रतिनिधी):पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गच उदघाटन पार पडलं. 2018 साली मोदींच्याच हस्ते या महामार्गाच भूमिपूजन झालं होत विक्रमी वेळेत सदरील महामार्गाचे शिर्डी पर्यंतचे काम पूर्ण करण्यात आले आहे.या महामार्गाला हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात आलं असलं तरी प्रत्यक्षात या महामार्गाला शिवसेनेचा प्रचंड विरोध होता नाशिक व विदर्भाच्या काही जिल्ह्यात शिवसेनेने या महामार्गाच्या भूमीसंपादनात काही स्थानिक शेतकरी संघटनांना हाताशी धरून अडथळे आणले.
नंतर समृद्धी महामार्गाच्या कामाचा विस्तार पाहून महाविकास आघाडीचे सरकार येताच त्यांनी या महामार्गाचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे नामांतर करून या महामार्गाचे श्रेय घेण्याचा प्रयत्नही केला.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच शिवसेनेचा या महामार्गाला असलेला विरोध हळूहळू मावळला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तर समृद्धी महामार्गाचे श्रेय घेण्यासाठी महामार्गाचे अर्धवट काम झाले असतानाही तत्कालीन सरकारने या रस्त्याच्या उदघाटनाचा घाटही घातला होता परंतु सरकारच अस्थिर असल्याने महाविकास आघाडीला यात यश आले नाही.
नंतरच्या काळात सरकार बदलले व शिंदे फडणवीस सरकारने पुढाकार घेऊन सदरील महामार्गाचे अर्धवट काम युद्धपातळीवर पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन करून हा महामार्ग देशाला अर्पण केला.या महामार्गाप्रमाणेच पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनलाही उद्धव ठाकरेंच्या सेनेचा प्रचंड विरोधाचा सामना करावा लागत आहे. भविष्यात मोदी, सेनेचा विरोध मोडीत काढून बुलेट ट्रेन कशी पूर्ण करतात हे दिसणारच आहे पण समृद्धी महामार्गाच्या बाबतीत मात्र उद्धव ठाकरेंसह संपूर्ण महाविकास आघाडीचा आधी विरोध, नंतर नामकरण व शेवटी श्रेयासाठी प्रचंड धडपड महाराष्ट्राला दिसून आली आहे.