चौथ्या औद्योगिक क्रांतीची संधी भारत…नरेन्द्र मोदी


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग लोकार्पण सोहळा अपडेट

नागपूर: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धीमहामार्ग लोकार्पण सोहळ्यात बोलताना प्रधान मंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘आज ७५ हजार कोटींचे प्रकल्प महाराष्ट्राला समर्पित होत आहे.११ प्रकल्पाच्या उद्घाटनाला मला बोलवल्याचा आनंद आहे.हे प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देतील.समृद्धीमहामार्ग कृषी उद्योगासाठी पूरक असून यामुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहे.पायाभूत सुविधांना मानवीय चेहरा देण्याचे काम सरकार करत आहे.’
पुढे बोलताना ते म्हणाले,’भारताला स्थायी विकास व स्थायी समाधानाची संधी आहे.चौथ्या औद्योगिक क्रांतीची संधी भारत गमावू शकत नाही ही संधी वारंवार येऊ शकत नाही त्यामुळे या संधीचे सोने करणे आवश्यक आहे.
जगातल्या अनेक देशांनी पायाभूत सुविधांचा विकास करून उन्नती केली. यादेशांनी देशातील करदात्यांच्या पैशाचा योग्य उपयोग केला. त्यातून उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या. त्यामुळे सरकारी खजिन्याच्या प्रत्येक पैसा सामान्यांच्या विकासासाठी वापरला गेला पाहिजे.’

मोदींचे ढोल वादन…
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कोनशिला अनावरणप्रसंगी प्रधानमंत्री Narendra Modi यांनी स्वतः ढोल वाजवत ढोलताशाचा आनंद घेतला. तसेच ढोलताशा पथकातील कलावंतांशी संवाद साधला.

मेट्रोचा प्रवास…
प्रधानमंत्री Narendra Modi मोदी यांच्याकडून नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या प्रदर्शनाची पाहणी आणि नागपूर मेट्रोने प्रवास केला.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग लोकार्पण सोहळा प्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे म्हणाले,’हा महामार्ग महाराष्ट्राची भाग्यरेखा ठरणार असून याद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार. समृद्धी महामार्गाचे लोकार्पण हा आनंदाचा क्षण आहे.
या महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्या गेल्याचा मला प्रचंड आनंद आहे.
प्रधानमंत्री Narendra Modi यांच्या हस्ते महामार्गाचे उद्घाटन होत असल्याचा अभिमान आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis मुख्यमंत्री असताना त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नाची ही पूर्ती आहे.भूमिग्रहणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली. वन्यजीवांचे देखील विशेष काळजी घेतली आहे’


याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,’हा महामार्ग गतिशक्तीचे उत्तम उदाहरण आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते लोकार्पण व्हावे ही आपली इच्छा आज पूर्ण होत आहे.
समृद्धी महामार्ग पूर्ण होईल याची एका व्यक्तीला पूर्ण खात्री होती ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्कालीन रस्ते विकास मंत्री म्हणून त्यांनी या रस्त्यासाठी विशेष प्रयत्न केले.हा एक मल्टीमोडल महामार्ग असून रेल्वे मार्गासाठीही यामध्ये जागेची तरतूद करून ठेवण्यात आली आहे.’
नागपूर मेट्रो टप्पा २ व नाग नदीचे पुनर्जीवन प्रकल्पासाठी प्रधानमंत्री कार्यालयाने तातडीने मदत केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply