स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त मोफत इंग्रजी संभाषण कला शिबीराचे आयोजन

मूकबधिरांना ब्लॅंकेट वाटप करणार: अरूण राऊत

बीड: स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 12.12.2022 सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता माजलगाव विधानसभा मतदार संघाचे नेते रमेशराव आडसकर यांच्या निवासस्थानी प्रतिमापूजनाचा कार्यक्रम व दुपारी साडे तीन वाजता तीन दिवसीय मोफत इंग्रजी संभाषण कला शिबिर व मूकबधीरांना ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती तालुका अध्यक्ष अरूण राऊत यांनी दिली.

डॉ. प्रकाश आनंदगावकर यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न होईल. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून रमेश आडसकर, मोहन जगताप, बबन सोळंके, नितीन नाईकनवरे, ज्ञानेश्वर मेंडके,अशोक तिडके, सुमन मुंडे, प्रभाकर साळेगावकर, गौरी देशमुख, तुकाराम येवले, नितीन मुंदडा तर विशेष उपस्थिती म्हणून डॉ. प्रशांत पाटील, दीपक मेंडके, लतीफ नाईक, सत्यनारायण सोनवणे, अभय होके, शरद यादव,ईश्वर होके, बबन शिरसट,धनंजय सोळंके,प्रल्हाद दळवी,राजेश साळवे, विनायक रत्नपारखी,शरद पवार, किसन वगैरे, रूपाली कचरे, जयश्री काळे उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास भाजपाच्या सर्व पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य, न.प सदस्य सोसायटी, चेअरमन ,बाजार समिती सदस्य,सरपंच, सदस्य शक्ती प्रमुख बुथ, प्रमुख कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन

भाजपा तालुकाध्यक्ष अरुण राऊत व भाजपा शहरध्यक्ष अँड सुरेश दळवे यांनी केले आहे.

Leave a Reply