संजय राऊतांना ठाकरे दांपत्य चपलेने मारणार!

या’वजनदार नेत्याचा खळबळजनक दावा

मुंबई – ठाकरेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेत असतात.काल त्यांच्यावर वॉरंट निघाल्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा मीडियामध्ये होत होती.आज मात्र ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. भाजपचे वजनदार नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्याविषयी अत्यंत स्फोटक दावा केला आहे.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे चपलेने मारतील, असे स्फोटक वक्तव्य भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.

याबाबत विस्ताराने सांगताना मंत्री नारायण राणे म्हणाले की संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर नारायण राणे यांच्या बाजूला बसून संसदेमध्ये उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्या बाबत काय काय बोलत होते हे मी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सांगणार असल्याचे नारायण राणे म्हटले आहे. दरम्यान संजय राऊत ठाकरे दांपत्या बद्दल काय काय बोलत असतील व नारायण राणे उद्धव ठाकरेंना भेटून संजय राऊत यांच्या बद्दल काय बोलणार आहेत या संदर्भात उत्सुकता निर्माण झाली आहे. संजय राऊत अगोदरच पिढीच्या केसमुळे अडचणीत असताना नारायण राणेंनी केलेल्या या वक्तामुळे ते खरंच आणखी अडचणीत येऊ शकतात का अशी चर्चा राजकीय वातावरणात रंगली आहे.

 

Leave a Reply