सरकारकडून महायुतीच्या आमदारांना निधीचे वाटप भरभरून निधी मिळाल्याने आमदारांनी……….

मुंबई

राज्य सरकारने युतीच्या आमदारांना भरभरून निधी दिला असून आमदारांच्या मनाप्रमाणे निधीचे वाटप केल्याने युतीच्या आमदारात आनंदाचे वातावरण आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधीच्या असमान वाटपामुळे अजित पवारांवर सेनेच्या आमदारांनी ठपका ठेऊन राज्यात सत्तांतर केले होते. राज्यात युतीचे सरकार आल्यावर पहिल्या वर्षभरात निधीचे वाटप झाले नाही परंतु अजित पवारांनी अर्थमंत्री पद स्वीकारतात राष्ट्रवादी, भाजप व सेनेच्या आमदारांना भरभरून निधी देणे सुरू केले आहे.त्यात युतीच्या प्रत्येक आमदारांना शंभर,दीडशे कोटिपर्यंत निधी दिल्याने युतीच्या आमदारात आनंदाचे वातावरण आहे. भाजपने आमदारां समवेत आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन नुकत्याच जाहीर केलेल्या विधानसभा निवडणूक प्रमुखांनाही निधीचे वाटप केले आहे यातून विधानसभा निवडणूक प्रमुखांना ताकद देण्याची भाजपची भूमिका यातून दिसून येत आहे.दरम्यान या निधी वाटपात काँग्रेस व शरद पवार गटातील आमदारांना डावलल्याने सदरील आमदार राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचे समजते.

Leave a Reply