भाजपचा बूथ स्तर मजबूत करणार- मोहन जगताप. बूथ प्रमुखांच्या मेळाव्याला कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद

 

माजलगाव दी 21

भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीत बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांचा मोठी भूमिका आहे.यापुढे माजलगाव मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहणार असून बूथ सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे मनोगत माजलगाव विधानसभेचे निवडणूक प्रमुख मोहनदादा जगताप यांनी केले.

 

आज भाजप संपर्क कार्यालयात भाजप नेते मोहन जगताप यांनी मेरा बूथ सबसे मजबूत उपक्रमा अंतर्गत माजलगाव तालुक्यातील सर्व बूथ प्रमुखांची बैठक घेण्यात आली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जैष्ठ भाजप नेते डॉ प्रकाश आनंदगावकर होते तसेच व्यासपीठावर तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी समयोचित मनोगते व्यक्त केले. मतदारसंघाचे नेते मोहन जगताप यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी बोलताना त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचा सूचना देऊन वन बूथ फिफ्टी युथ आवश्यक असून स्वतःच्या बूथ वर जास्तीत जास्त नवमतदार नोंदणी करण्याचे आवाहन करून  बूथ वरील बोगस मतदान कमी करण्याच्या सूचना दिल्या.बूथ स्तरावरील कार्यकर्ता हा भाजपचा कणा असून आगामी काळात त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.ज्या बूथ प्रमुखांना काम वाढवण्यात अडचणी असल्यास त्या अडचणी ओळखून त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मोहन जगताप यांनी स्पष्ट केले.

राज्यात ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याकडे जास्त लक्ष न देता कार्यकर्त्यांनी स्वतःचा बूथ मजबूत करावा बूथ सक्षमीकरणात काही अडचण आल्यास मला थेट संपर्क करावा असे आवाहन करून लवकरच माजलगाव मतदारसंघातील सर्व बूूूथ प्रमुखांचा व्यापक मेळावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या बूथ प्रमुखांच्या बैठकीचे नियोजन करण्यास कमी वेळ मिळूनही माजलगाव तालुक्यातील बूथ प्रमुखांनी या बैठकीस चांगला प्रतिसाद दिला या बैठकीस बूथ प्रमुखांसह शक्ती केंद्र प्रमुख, भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply