राहूल गांधी यांच्या वक्तव्याचा माजलगाव भाजप कडून निषेध

शिवसेनेने केले जोडे मारो आंदोलन

 

 

माजलगाव, दि. १८,(प्रतिनिधी):  भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे ,जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या सूचनेवरून व माजलगाव भाजप नेते  रमेशराव आडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज माजलगाव तहसील येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अपशब्द वापरून अपमान करून तमाम भारतवासियांच्या भावना दुखावल्या बद्दल काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी माफी मागावी असे निवेदन तहसील कार्यालय येथे देण्यात आले. तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राहुल गांधी च्या प्रतिमेची गाढवावरून धींड काढत जोडे मारो आंंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हा सचिव बबन सोळंके बोलताना म्हणाले प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विषयी खासदार राहुल गांधी यांनी अपशब्द वापरून तमाम देशवासीयांच्या भावना दुखावल्या आहेत राष्ट्रभक्त सावरकर हे देशाचे गौरव आहेत त्यांच्याविषयी खोटी विधान करून त्यांची बदनामी करण्याची षडयंत्र या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर वेगवेगळी खोटी विधाने करून अपमान केला जात आहे व सावरकरांना बदनाम करण्याचं प्रयत्न या ठिकाणी चालू आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सतत इंग्रजांविरुद्ध एक मोठी चळवळ उभारली आयुष्यभर संघर्ष करण्याचे काम त्यांनी केले देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये प्रयत्न केले एवढेच नाही तर स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवून सतत दोन वेळा काळ्यापाण्याची शिक्षा भोगून आपल सर्व जीवन देशाला अर्पण करून स्वातंत्र्य मिळून दिले अशा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या राहुल गांधीला देश कधीही माफ करणार नाही तरी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या राहुल गांधींनी तात्काळ माफी मागावी अन्यथा यापुढील काळात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असे बबन सोळंके यांनी यावेळी म्हटले.

यावेळी उपस्थित सर्वांनी भारत माता की ,जय वंदे मातरम च्या घोषणा दिल्या तसेच राहुल गांधी मुर्दाबाद या घोषणाने परिसर दुमदुमला . या आंदोलनात ज्ञानेश्वर नाना मेंडके, डॉ.प्रशांत पाटील, नगरसेवक विनायक रत्नपारखी,दत्ता महाजन,सरपंच खय्युम पठाण , आनंद कुलकर्णी ,अंजुम भाई , छबनराव घाडगे सुशांत जाधवर अनिरुद्ध सोळंके मंचकराव गायकवाड,सोमेश दहिवाळ,राम शिंदेे, जयपाल भिसे, महादेव बादाडे,प्रसाद देशमुख, बाळासाहेब बोरचाटेे, जिवंन ताटेे, नारायण गवळी भाजपा पदाधिकारी शक्ती प्रमुख बूथ प्रमुख ,कार्यकर्ते व सावरकर प्रेमी उपस्थित होते.

Leave a Reply