प्रेम प्रकरणातून तरुणाचे बळजबरी धर्मांतर व सुंता!

खासदार इम्तियाज जलील…

संभाजीनगर (प्रतिनिधी) श्रद्धा प्रकरण ताजे असताना आता संभाजीनगर येथे बौध्द मुला सोबत घडलेल्या बळजबरी धर्मांतराच्या घटनेने खळबळ माजली आहे. या घटनेत एम आय एम चे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर मुलाला मारहाणीचे आरोप झाले आहेत.

संभाजीनगर येथील दीपक रामदास सोनवणे या युवकाने पोलिसात खासदार इम्तियाज जलील,सना फरहीन शेख व इतर चार लोकां विरुद्ध स्वतःच्या बळजबरी धर्मांतराची तक्रार दिली आहे.

दीपक व सना हे दोघेजण एकत्र शिक्षण घेत होते दरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.सनाने दीपकला लग्नासाठी त्याला मुस्लिम होऊन नमाज पठण करण्याची अट घातली त्यानंतर त्या मुलाला सना शेखच्या नातेवाईकांनी एका खोलीत डांबून त्याचा शारीरिक छळ करीत घटनेचा विडिओ काढला तसेच खतना करून मुस्लिम हो अन्यथा तुझा व्हिडिओ करू अशी धमकी दिली.दुसऱ्या दिवशी दिपकला घेऊन सनाचे नातेवाईक एका डॉक्टर कडे गेले व तिथे त्याचा खतना करून त्याला गुलमंडी येथे वापस सोडले.सदरील घटनेनंतर भयभीत झालेल्या युवकाने सना शेख पासून अंतर राखले परंतु मुलीच्या नातेवाईकाने विडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पैश्यांची मागणी केली भयग्रस्त दीपक सोनवणे याने पंचवीस लाख रुपये मुलीला दिले. परंतु जवळील पैसे संपल्यावर मुलीने दीपक विरुद्ध 354 ची तक्रार दाखल केली तक्रार वापस घेण्यासाठी एकतर पंचवीस लाख रुपये दे किंवा ईस्लाम स्वीकार अशी मागणी केली. पैसे नसल्याने दीपकने मुसलमान होण्यास तयार झाला नंतर दिपकला पुन्हा एकदा खोलीत डांबून त्याला झाकीर नाईकांचे विडिओ दाखवण्यात आले दिपकने विरोध केल्यावर त्याला खासदार इम्तियाज जलील कडे नेऊन त्याला खा. जलीलच्या सांगण्यावरून परत एका खोलीत डांबून मारहाण करण्यात आली दरम्यान दिपकच्या सहनशीलतेचा अंत झाल्यावर त्याने पोलिसात धाव घेतली तसेच पत्रकार परिषदेत सना शेख सहित खा.इम्तियाज जलील यांच्यावर आरोप केले आहेत.दरम्यान दीपक सोनवणे सोबत घडलेल्या जबरी धर्मांतरच्या घटनेने पूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पोलिस या प्रकरणी आता पर्यंत गप्प का होते असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply