हर घर सावरकर सप्ताह निमित्त सावरकर गौरवदीन उत्साहात साजरा
माजलगाव: स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त हर घर सावरकर सप्ताह निमित्त सावरकरांचा गौरव दिन म्हणून अनादी मी अनंत मी अर्थात सावरकरांच्या असीम प्रतिभेतून प्रस्फूरीत गीतांचा कार्यक्रम स्वराविष्कार गायनाच्या कार्यक्रम राजस्थानी मंगल कार्यालय माजलगाव येथे संपन्न झाला.या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन करून करण्यात आली. दिनांक 21 ते 28 मे हा सावरकर सप्ताह गौरव सोहळा म्हणून संपूर्ण भारतात साजरा होत आहे . त्याचाच एक भाग म्हनुन आज माजलगाव येथील राजस्थानी कार्यालयात सावरकरांचा गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
सावरकर कला मंच माजलगाव व महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संगीत रूप स्मरण गीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाची संकल्पना निवेदन प्राध्यापक स्नेहल पाठक यांनी केले यावेळी बोलताना त्या म्हणाल्या सावरकरा यांची राष्ट्रनिष्ठा, ध्येयनिष्ठा सावरकर यांनी केलेला त्याग , समर्पण हे कायम सर्वांना प्रेरणादायी राहील , पुढील काळात संपूर्ण देश-विदेशात सावरकरांचे कार्य विचार पोहोचविण्यासाठी समर्पित करणार आहे असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले. तसेच हा कार्यक्रम अभय होके पाटील, दीपक मेंडके, विनायक रत्नपारखी, दत्ता महाजन यांनी अतिशय नियोजनबद्ध करून आयोजित केला त्याबद्दल आयोजकांचे विशेष अभिनंदन करून त्यांनी कौतुक केले. या संगीत कार्यक्रमात सावरकर विचार मंचचे ओंकार मोगरेकर, प्रसाद पटवारी, अन्वी जाधव, श्रेया ठोंगे, मृदुला नऊशिंदे, सायली जवळेकर, अंकुश साबळे, अनुजा साबळे, समीक्षा खळगे या कलाकारांनी सुंदर सावरकरांचे गीत सादर केले तर Adv.श्रीराम देशपांडे यांनी तबला व ढोलकी तसेच संवादिनीवर संजय कुलकर्णी यांनी तर बासरी शेख हायुम यांनी साथ केली. फटका, पोवाडा, लावणी, शिवरायांची आरती प्रभू रसिंहराया, शिवस्तोत्र, अनादिमी अनंत मी, जयस्तुते जयस्तुते ,ने मजसी ने , शतजन्म शोधताना आणि जयस्तुतेने या कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सर्व स्थानिक कलाकारांनी अतिशय उत्तम प्रकारे सादरीकरण केल्यामुळे रसिक मंत्रमुग्ध झाले होते . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विनायक रत्नपारखी म्हणाले स्नेहल पाठक मॅडम यांनी देशात व विदेशात देखील सावरकरांचे कार्य चालू केले आहे हे त्यांचे कार्य पाहून आम्ही प्रेरित झाल्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गीताचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला , तरुणापुढे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे व सर्व महापुरुषांचे कार्य जाणे हे गरजेचे आहे सर्व महापुरुषांचे समर्पण त्याग राष्ट्रनिष्ठा धेय्य निष्ठा हे सर्वांसमोर जाणे गरजेचे आहे त्यामुळे तरुनामध्ये राष्ट्र जागृती होईल राष्ट्रप्रेम राहील, त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण होईल , त्यामुळे पुढील काळात देखील महापुरुषांची जयंती अशा विविध सामाजिक उपक्रमांनी व्याख्याने गीत गायनाने करण्यात येतील असे सांगितले.
यावेळी पोलीस निरीक्षक बल्लाळ साहेब यांनी सावरकर गौरव दिन हा सावरकर कला मंच व आयोजकांनी अतिशय चांगला ,व स्तुत्य उपक्रम घेऊन साजरा केला त्याबद्दल आयोजकांचे कौतुक व अभिनंदन केले , सावरकरांच्या आठवणीला उजळा देत त्यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माजी आमदार राधाकृष्णअण्णा होके पाटील, माजी मोहनराव सोळंके, डॉ प्रकाशराव आनंदगावकर, दैनिक पार्श्वभूमी चे संपादक गंमत भंडारी, भिकचंदजी दुगड, संभाजीनगरहून उपस्थित राहिलेले भाऊ सुरडकर, सुभाष कुमावत, किरण सराफ तसेच माजी नगराध्यक्ष डॉ अशोक तिडके , शिवसेना तालुकाप्रमुख तुकाराम येवले, प्रभाकर साळेगावकर, संतोषआबा यादव, राजेगाव च्या सरपंच रूपालीताई कचरे, सौ सविता अमरनाथ खुरपे, पत्रकार उमेश मोगरेकर कमलेश जाबरस, सुधीर नागापुरे, ईश्वर खुरपे, डॉ स्वानंद कुलकर्णी, शरद यादव , सुरेश भानप, डॉ सचिन देशमुख, डॉ.शैलेश पाठक, संतोष कोथळकर, पीसी देशमुख, बाळू शिरसागर, अनंद कुलकर्णी सर, सतीश जोशी तालखेडकर, अनंत जगताप, सुरेश भानप, अजय सोळंके, बाळासाहेब देशपांडे, मुकुंद जोशी, भारत होके व सावरकर प्रेमी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रमेश गटकळ सर यांनी तर आभार प्रदर्शन दत्ता महाजन यांनी केले .