स्वा.सावरकर यांच्या जयंतीनिमित्त माजलगाव येथे भाजप च्या वतीने कार्यालय तेथे सावरकर उपक्रम 

माजलगाव: 28 मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतात गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे.

 

त्यानिमित्त माजलगाव मध्ये कार्यालय तेथे सावरकर या उपक्रमांतर्गत दिनांक 26 मे शुक्रवार रोजी माजलगाव तहसील मध्ये तहसीलदार वर्षा मनाळे मॅडम पंचायत समितीमध्ये मुख्याधिकारी भोसले मॅडम नगरपरिषद माजलगाव मध्ये निळेकर साहेब गटशिक्षणाधिकारी कुलकर्णी साहेब व शहर पोलीस स्टेशनमध्ये शितल कुमार बल्लाळ साहेब यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा भेट दिली.

यावेळी उपस्थित भाजपा जिल्हा सचिव बबनबप्पा सोळंके, डॉ सुशीलभैया लोढा, डॉ अर्चना पवार मॅडम, विनायक रत्नपारखी, शरद यादव, अविनाश गोंडे, सतीश वाघोरकर, आनंद कुलकर्णी सर, दत्ता महाजन, छबन घाडगे, सतीश जोशी तालखेडकर व स्वातंत्र्यप्रेमी व अन्य मान्यवर नागरिक उपस्थीत होते.

Leave a Reply