खरिपाच्या पेरणीसाठी शासनाकडून अनुदानावर बियाणे मिळवा!

असा करा अर्ज; संपूर्ण माहिती वाचा एका क्लिकवर!

पुणे: खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपलेला असल्याने शेतकरी आता खरिपाच्या तयारीला लागले आहेत. महाराष्ट्र शासनाने सुद्धा खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना सहाय्यक ठरेल अशी योजना आखली आहे.या योजनेनुसार शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर बियाणे मिळणार आहे.चला तर मग शेतकरी बंधू भगिनींनो आज आपण या Biyane anudan yojna योजनेची माहिती घेऊया. योजनेची सविस्तर माहितीसाठी खालील लेख शेवटपर्यंत वाचा…

 

काय आहे योजना…? Scheme details: 

महाराष्ट्र शासनाची बियाणे अनुदान योजने Biyane anudan yojna अंतर्गत शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर बियाणे मिळतात. यामध्ये प्रमाणित बियाणे व पीक प्रादेशिक बियाणे असे दोन प्रकार आहेत. पीक प्रात्यक्षिक बियाणे प्रकारामध्ये बियाणे बरोबरच खत, औषधे सुद्धा मिळतात व यासाठी गावातील काही शेतकऱ्यांची निवड केली जाते.

प्रमाणित बियाणे वाटप करताना सदर बियाण्याच्या किट शेतकऱ्यांना वाटप केल्या जातात.

 

कोणत्या बियाण्यासाठी करू शकता अर्ज? 

महाराष्ट्र शासनाच्या बियाणे अनुदान योजना 2023 अंतर्गत शेतकरी बांधव खालील बियाण्यांसाठी या योजनेअंतर्गत मागणी करू शकतात.

१) सोयाबीन

२) तूर

३) कापूस

४) मूग

५) उडीद

व खरिपाची इतर बियाणे वाटप करण्यात येतात. शेतकरी बांधवांनी शासनाच्या या योजनेचा अवश्य लाभ घ्यायला हवा.

 

 किती मिळेल अनुदान? Subsidy persentage: 

महाराष्ट्र शासनाच्या बियाणे अनुदान योजनेअंतर्गत प्रमाणित बियाण्यांसाठी 50 टक्के अनुदान तर पीक प्रात्यक्षिकासाठी एकरी ४०००/- (चार हजार रुपये) अनुदान मिळू शकते. यासाठी आपल्याला ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

असा करा अर्ज… How to apply for biyane anudan yojna 

 

महाराष्ट्र शासनाच्या बियाणे अनुदान योजनेअंतर्गत बियाणे अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आपणास महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी या शेतकरी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावा लागेल. अर्ज सादर करण्याची संपूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप खाली देत आहोत. कृपया काळजीपूर्वक वाचा.

 

१) सर्वप्रथम शासनाच्या महाडीबीटी फार्मर या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन आपले अकाऊंट तयार करा. यापूर्वीचे अकाउंट असेल तर पासवर्ड व युजरनेम चा वापर करून डायरेक्ट लॉगिन करा. आपल्या सोयीसाठी लिंक खाली देत आहोत.

https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login

 

२) लॉग इन केल्यानंतर सर्वप्रथम आपली प्रोफाइल 100% पूर्ण करा. यापूर्वी आपण प्रोफाइल पूर्ण केलेली असेल तर पुन्हा प्रोफाइल पूर्ण करण्याची आवश्यकता भासणार नाही.

 

३) प्रोफाइल पूर्ण झाल्यानंतर बी-बियाणे, खते, औषधे या ऑप्शन वरती क्लिक करा.

 

४) यावेळी तुमच्यासमोर बियाणे अनुदान योजनेचा अर्ज उघडलेला असेल त्यात विचारलेली माहिती भरा; आपल्याला पाहिजे ते बियाणे सिलेक्ट करा. यानंतर सर्व माहिती व्यवस्थित चेक करून पेमेंट करा व आपला अर्ज दाखल करा. अर्ज दाखल झाल्यानंतर लघु संदेशाद्वारे (एसएमएस) आपणास महाडीबीटी पोर्टल कडून कळवले जाईल.

 

अशाच नवनवीन माहिती, सरकारी योजना, जॉब अलर्ट व बातमी मागील बातमीसाठी वाचत राहा महा जागरण… तसेच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका. लिंक 👇

https://chat.whatsapp.com/F4JQZAN1WPO4ByfLldvmfV

Tags: maha Jagran mahajagran, महा जागरण, बातमी नव्हे तथ्य, बातमी मागील बातमी

Leave a Reply