सराफा व्यापाऱ्यांना नडला सुवर्ण कारागिराचा बंगालपणा!

माजलगाव, दि.१४: शहरातील पाच सराफा व्यापाऱ्यांनी घडई (डीझाईन) करण्यासाठी दिलेले अर्धा किलो सोने घेऊन बंगाली कारागीर फरार झाला आहे.

 

याविषयी अधिक माहिती अशी की, माजलगाव शहरातील पाच सराफा व्यापाऱ्यांनी दागिने तयार करण्यासाठी म्हणून जवळपास ५०० ग्रॅम (अर्धा किलो) सोने नाज्बुल इस्लाम शेख (रा. पश्चिम बंगाल) व त्याच्या हाताखालचा कारागीर कडे दिले होते.मात्र, त्याने घडई (डिझाईन) न करता हे सोने घेऊन पोबारा केला आहे.त्याचबरोबर एक मोटार सायकल ( एम.एच.२० इ एक्स ३१३४) नेली आहे.हा प्रकार काल शनिवारी समोर आला. याबाबत सराफ व्यापाऱ्यांकडून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्याने शहरात एकाच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी मात्र अद्याप पोलिसात तक्रार देण्यात आलेली नाही.

माजलगाव शहरात मोठया संख्येने सराफा व्यापारी दुकान आहेत. यातील बहुतांश व्यापारी हे ग्राहकांनी दिलेली घडई/ मोड व नविन सोन्याच्या बिस्किटां पासून दागिने तयार (डिझाईन) बनवण्यासाठी या सुवर्ण कारागिराकडे देत असतात.नेहमीप्रमाणेच शहरातील पाच व्यापाऱ्यांनी डिझाईन बनवण्यासाठी दिलेले सोने घेऊन हा बंगाली शनिवारी रात्री शहरातून फरार झाले असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट द्वारे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.यामुळे सराफा व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. या सोन्याची किंमत जवळपास ३० लाख रुपये व मोटरसायकलची किंमत ९० हजार रुपये असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

याबाबत हे व्यापारी रविवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी या सोन्याच्या पावत्या मागितल्याने हे सराफ व्यापारी परत पोलीस ठाण्याकडे फिरकलेच नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Maha jagran mahajagran

Leave a Reply