राजश्री शाहू महाराज यांनी स्थापन केलेल्या बोर्डिंगवर वक्फ बोर्डाने आपला दावा केला आहे मोहमद एज्युकेशन सोसायटी या नावाने असलेल्या या संस्थेच्या 3500 कोटीच्या मालमत्तेवर ताबा घेण्याचा प्रयत्न वक्फ बोर्डाचा असून या घटनेने कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. वक्फ बोर्डाला या बोर्डिंग स्कुलचा ताबा घेण्यासाठी नोंदणी प्रमाणपत्र ही दिले असून तसेच वक्फ बोर्डाला 1995 साली काँग्रेस सरकारने दिलेल्या विशेष अधिकारामुळे या बोर्डिंग स्कूलवर लवकरच वक्फ बोर्डाचे नियंत्रण येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
याबाबत धर्मादाय आयुक्तांना वक्फ बोर्डाने नोटीस पाठवून विश्वस्तांची यादी अर्थसंकल्पीय कागदपत्रे आणि इतर तपशील देण्याचे आदेश दिले आहेत मात्र ही संस्था राजश्री शाहू महाराज यांनी शैक्षणिक आणि सामाजिक कामासाठी उभी केली असल्याने आणि सध्या पदसिद्ध अध्यक्ष सध्याचे शाहू महाराज असल्याने वक्फ बोर्डाच्या या निर्णयाने कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.