अजित पवारांनी का नाकारले सहाव्या मजल्यावरील शापित दालन काय घडले होते तिथे?वाचा……

राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत आठवडाभरापूर्वी अजित पवार यांनी सगळ्यांनाच धक्का देत राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधील आमदारांचा मोठा गट फोडला होता तेव्हापासून अजित पवार यांची प्रत्येक वक्तव्य आणि आणि कृती चर्चेचा विषय आहे.

यामध्ये आता भर पडली असून गेल्यावेळी 2019 मध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती मात्र हे सरकार अल्पजीवी ठरले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार कोणताही धोका पत्करायला तयार नसल्याची चर्चा रंगली आहे याच धारणेतून अजित पवार यांनी मंत्रालयातील 602 नंबरची शापित केबिन नाकारल्याचे सांगितले जात आहे.कोणत्याही मंत्र्याला हे दालन मिळाल्यावर या दालनात येण्यास ते घाबरतात

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर असलेली 602 नंबरची केबिन अशोक व शापित मानली जाते. या केबिन मधून आतापर्यंत काम करणाऱ्या कोणत्याही मंत्र्याला बढती मिळालेली नाही उलट त्याला राजकीय जीवनात बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे अशी अजित पवारांची समजूत आहे याच भावनेतून अजित पवार यांनी ही केबिन नाकारली आहे  तसेच  मंत्रालयाला जेंव्हा आग लागली होती तेंव्हा याच दालनासमोर अनेकजण होरपळले होते. या आगीत मंत्रालयातील अनेक जण होरपळून मृत्युमुखी पडल्याची ही घटना घडली होती. दरम्यान अजित पवार आता सहाव्या मजल्यावरच थांबणार का स्वतःचं कार्यालय इतरत्र बदलून घेणार याकडे लक्ष लागले आहे

Leave a Reply