पंकजा मुंडेंनी घेतली सोनिया व राहुल गांधींची भेट. पंकजा मुंडेंचे काँग्रेस मधे स्वागत-नाना पटोले

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिल्लीत दोन वेळेस सोनिया व राहुल गांधींची भेट घेतलल्याचे वृत्त प्रसारमाध्यमात दाखवले जात असून लवकरच त्या काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा सांगलीतील एका काँग्रेस नेत्याने केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना याबाबत पत्रकारांनी विचारले असता पंकजा मुंडे काँग्रेस मधे येणार असतील तर त्यांचे स्वागत असल्याचे सांगितले.दरम्यान महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपाच्या आधी 3 जून रोजी पंकजा मुंडे यांनी त्यांच्या मनातले शल्य जाहीर करून लवकरच अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

Leave a Reply