नरेंद्र पाटलांचे वर्मावर बोट!
सातारा : शरद पवार यांना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जाणता राजा ही पदवी दिली जाते. मात्र, ते कुठे लढायला गेले होते? असा खोचक सवाल अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कुणीही अवमानकारक भाष्य करणं अयोग्य आहे. शिवछत्रपती हे देशाचे आराध्य दैवत असून, कुठल्याही महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह बोलणं चुकीचं आहे.कार्यकर्त्यांनीही नेत्यांना पदवी देताना शब्दांचा योग्य वापर करावा, असं मत त्यांनी व्यक्त केले.
अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून २०१८ पासून तीन हजार ५०० कोटींचे कर्जवाटप व ५० हजार लाभार्थी जोडले असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.या योजनेतील बहुतांश लाभार्थी परतावा करत असल्याने विविध बँका स्वागत करत आहेत असेही ते म्हणाले.