अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना ८-अ व पिक पेऱ्यानुसार १००% नुकसानभरपाई द्यावी-बाबासाहेब आगे

नुकसाभरपाई न मिळाल्यास न्यायालयाचे दार ठोठावणार

माजलगाव, दि.९,(प्रतिनिधी):अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना ८-अ व पिक पेऱ्यातील पीक नोंदीनुसार १००% नुकसानभरपाई मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क असताना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी- कर्मचारी यांच्या उदासीन भूमिकेमुळे शेतकरी आपल्या हक्कापासून वंचित राहत आहेत.यावर्षी १००% नुकसाभरपाई न मिळाल्यास न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचा इशारा भाजप तालुका सरचिटणीस बाबासाहेब आगे यांनी दिला आहे.

याबाबत तहसीलदार माजलगाव यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,सध्या महाराष्ट्रात मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या रुपाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारे सरकार आहे. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधीची उदासीन भूमिका व प्रशासनातील काही अधिकारी-कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना १००% नुकसान भरपाई मिळत नाही. शेतकऱ्यांच्या ८-अ प्रमाणे तसेच ७/१२ वरील पिक पेरा नोंदीनुसार त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. माजलगावच्या शेजारील तालुक्यांमध्ये अनेक वर्षांपासून ९०% ते १००% पर्यंत नुकसान भरपाई मिळते. मात्र माजलगाव मतदार संघातील राजकीय नेत्यांच्या उदासीनपणामुळे व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. जर यावेळेस शेतकऱ्यांना त्यांच्या हक्का नुसार १००% नुकसाभरपाई मिळाली नाही तर कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करण्याचा तसेच मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना घेऊन तहसील व कलेक्टर ऑफिस समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा बाबासाहेब आगे भाजपा तालुका सरचिटणीस, माजलगाव यांनी दिला आहे.

Leave a Reply