शिवसेनेत आता महिलांचं बंड होणार!

या’ बाई मुळे महिला नेत्या झाकोळल्या…

पुणे (प्रतिनिधी): एकनाथ शिंदे यांच्या यशस्वी बंडा नंतर आता शिवसेनेत (ठाकरे गट) लवकरच महिलांचं बंड होणार असल्याचा दावा मनसे नेते प्रकाश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.

शिवसेनेतील अंतर्गत मतभेदांबाबत वक्तव्य करताना ते म्हणाले की, शिवसेनेत काही दिवसांपूर्वीच आलेल्या सुषमा अंधारे यांच्यामुळे, त्यांच्या भाषणांमुळे पक्षातील महिला नेत्यांची कारकीर्द झाकोळली गेली आहे.या बाईमुळे शिवसेनेच्या इतर महिला नेत्या अंधारात गेल्यात, त्यामुळे उद्धव ठाकरेंना लवकरच महिलांच्या बंडालाही सामोरं जावं लागणार आहे, असा दावा प्रकाश महाजन यांनी केला.

सुषमा अंधारे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना प्रकाश महाजन म्हणाले, आम्ही दोघंही बीड जिल्ह्यातले आहोत. या बाईला काय बोलावं कळत नाही. तिला बोलायला ठेवलंय. भुंकायला नाही. मेंदूला नारू झालाय की काय तिच्या?

इतकी वर्ष महापालिकेत सत्ता असून मातोश्रीवर मजला चढला नाही आणि कृष्णकुंजचा विकास झाला… हे बोलण्याआधी तिनं मालकाला विचारलं पाहिजे नं… माझे नेते व्यवसाय करतात. शासनाचे सगळे नियम पाळतात.सुषमा अंधारेंना प्रकाश महाजन यांनी प्रश्न केला. मातोश्री 2 हे कशावर झालं हे तिनं पाहिलं नाही का, 126 कोटी बापाचे, 11 कोटी मुलाचे कुठून आले? कशाला बोलताय?

ते कसं झालंय. नवीन मुसलमान झाला म्हणजे, दिसेल त्याला आदाब आदाब करत सुटली ती… इथून पुढे एक लक्षात ठेवा, मनसेवर टीका करताल तर… आम्हाला तुमचं सगळच माहिती आहे, असा इशारा प्रकाश महाजन यांनी दिला.राज ठाकरेंना पुत्रमोह झालाय, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली. मात्र सुषमा अंधारेंना तो मोह होऊ शकत नाही, अशी तिची अडचण असल्याचं प्रत्युत्तर प्रकाश महाजन यांनी दिलं.काही महिन्यांपूर्वी सेनेत पुरुषांचं बंड झालं. आता राहिलेल्या सेनेत बायकांचं बंड होणार आहे. उठ बस ठणाणणा करणारी सेना आहे, त्यात आता बायकांचं बंड होणार आहे. या बाईमुळे ज्या उजेडात बायका होत्या, त्या अंधारात गेल्या आहेत, त्या गप्प बसणार नाहीत, असा इशारा प्रकाश महाजन यांनी दिला आहे.

Leave a Reply