श्रीराम मंदिर लोकार्पण व शिवराज्याभिषेक सोहळा धुमधडाक्यात साजरा करणार: अनंत शास्त्री जोशी ‌‌‌

माजलगाव , दि.२७ (प्रतिनिधी): अनेक शतकांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर साकार झाले आहे, या मंदिरात 22 जानेवारी रोजी रामलल्ला विराजमान होणार आहेत. या सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा शहरात धुमधडाक्यात साजरा करणार असल्याची माहिती वेदमूर्ती लोकोत्सव समितीचे अध्यक्ष अनंत शास्त्री जोशी यांनी दिली आहे .
आज शहरातील वैष्णवी मंगल कार्यालयात श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा व 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा समितीची बैठक लोकोत्सव समितीचे अध्यक्ष अनंत शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षेखाली उत्साहात संपन्न झाली. यावेळी जैष्ठ वकील ऍड भानुदासराव डक, किसान संघाचे राज्य अध्यक्ष बळीराम सोळंके, रा. स्व संघ विभाग कार्यवाह आनंद गुजर सर, उद्योजक ओंकार खुर्पे, सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलाचे माजी पदाधिकारी अमरनाथ खूर्पे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष हनुमान कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहन घाडगे, विनायक रत्नपारखी यांच्यासह रामभक्त व शिवप्रेमिंची उपस्थिती होती. या प्रसंगी जगदीश साखरे यांनी प्रभू श्रीराम मंदिर उत्सव समितीच्या वतीने तालुक्यात घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली तसेच शिवशंभू विचार मंचाचे कार्यकर्ते पवन मोगरेकर यांनी 350 वा शिवराज्याभिषेकाचे इतिहासकालीन महत्व विषद करून आगामी काळातील कार्यक्रमाची रूपरेखा स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षिय समारोपात अनंत शास्त्री जोशी यांनी माजलगाव तालुक्यात श्रीराम मंदिर लोकार्पण व 350 वा शिवराज्याभषेक दिन धुमधडाक्यात साजरा करणार असल्याचे सांगून लोकोत्सव समितीची घोषणा केली. आगामी काळात या लोकोत्सव समितीच्या विविध बैठका होणार असून मंदिर लोकार्पण व शिवराज्याभिषेक सोहळ्या बाबत कार्यक्रमांची रूपरेषा ठरणार आहे.

Leave a Reply