राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत आज मंत्रालयात जाहीर झाली आहे. या सोडतीत ST साठी 1, SC साठी 3, महिलांसाठी 8 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 17 महापौरपदे निश्चित झाली आहेत.
ही सोडत मंत्रालयात जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गाला महापौरपद मिळणार, हे स्पष्ट झालं आहे. यामध्ये मुंबई महापालिकेच्या महापौरपदाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
महापौर पदांसाठी आरक्षण 29 महापालिका
आज जाहीर झालेल्या सोडतीनुसार—अनुसूचित जमाती (ST): 1 जागा
राज्यातील 29 पैकी 1 महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे.अनुसूचित जाती (SC): 3 जागा
3 महापौरपदे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. यामध्ये महिला आणि पुरुष आरक्षणाचा समावेश राहणार आहे.नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – 8
महापालिका अधिनियम 2006 नुसार 8 महापालिकांमध्ये महापौरपद ओबीसीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. यामध्ये महिला आणि पुरुष आरक्षणाचा समावेश आहे.सर्वसाधारण (ओपन): 17 जागा
उर्वरित 17 महापौरपदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी ठेवण्यात आली आहेत. यामध्ये महिला आणि पुरुष आरक्षणाचा समावेश आहे.

कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गाचं आरक्षण?
कल्याण डोंबिवली – एसटीलातूर – अनुसूचित जाती (महिला)
जालना – अनुसूचित जाती (महिला)
ठाणे – अनुसूचित जाती
पनवेल – ओबीसी
इचलकरंजी – ओबीसी
अकोला – ओबीसी (महिला)
अहिल्याबगर – ओबीसी (महिला)
उल्हासनगर – ओबीसी
कोल्हापूर – ओबीसी
चंद्रपूर – ओबीसी (महिला)
जळगांव – ओबीसी (महिला)
मुंबई – खुला प्रवर्ग (महिला)
पुणे महानगरपालिका – खुला प्रवर्ग (महिला)
छत्रपती संभाजीनगर – खुला प्रवर्ग (महिला)
धुळे महानगरपालिका – खुला प्रवर्ग (महिला)
अमरावती – खुला प्रवर्ग (महिला)
भिवंडी-निजामपूर – खुला प्रवर्ग
मालेगाव – खुला प्रवर्ग (महिला)
मीरा-भाईंदर – खुला प्रवर्ग (महिला)
नागपूर – खुला प्रवर्ग (महिला)
नांदेड-वाघाळा – खुला प्रवर्ग (महिला)
पिंपरी-चिंचवड – खुला प्रवर्ग
नाशिक – खुला प्रवर्ग (महिला)
नवी मुंबई – खुला प्रवर्ग (महिला)
परभणी – खुला प्रवर्ग
सांगली-मिरज – खुला प्रवर्ग
वसई-विरार – खुला प्रवर्ग
सोलापूर – खुला प्रवर्ग