संगीतकार ए. आर. रहमान हे विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘छावा’ हा चित्रपट फूट पाडणारा चित्रपट असल्याचे म्हटलं. मात्र, आपण केवळ कला आणि संगीतासाठी हा चित्रपट स्वीकारल्याचे त्यांनी म्हटलं. ज्यानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत. आता लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या तस्लिमा नसरीन यांनीही ए. आर. रहमान यांच्या या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हटलं आहे तस्लिमा नसरीन यांनी?
ए. आर. रहमान ही तक्रार करत आहेत की त्यांना मुस्लिम असल्याने हिंदी चित्रपटसृष्टीत काम मिळत नाही पण शाहरुख खान आजही बॉलिवूडचा बादशाह आहे. सलमान खान, आमिर खान, जावेद अख्तर, शबाना आझामी हे सगळे सुपरस्टार आहेत. प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यक्तींना कधीही अडचणी येत नाहीत त्यांचा धर्म कुठलाही असो. असं तस्लिमा नसरीन म्हणाल्या.
अडचणी गरीबांना येतात, श्रीमंतांना नाही-तस्लिमा नसरीन
पुढे तस्लिमा म्हणाल्या, “अचडणी कायम गरीब व्यक्तींना येतात. मी नास्तिक आहे, पक्की नास्तिक. माझ्या नावामुळे मला मुस्लिम आहे ही असं ओळखलं जातं. जे मुस्लिम विरोधी आहेत ते समोरची व्यक्ती आस्तिक आहे की नास्तिक हे बघत नाहीत. मी नास्तिक आहे म्हणून हैदराबादमध्ये मला मारहाण झाली. रुग्णालयात माझी फसवणूक झाली. मला घर भाडे तत्त्वावर मिळत नाही. छत्रपती संभाजी नगरमध्ये मला प्रवेश नाही. बंगालमधून मला हाकलून देण्यात आलं. या समस्या ए. आर. रहमान किंवा बॉलिवूडच्या मुस्लिम स्टार मंडळीना सहन कराव्या लागल्या नाहीत.
“ए.आर. रहमान यांचं वक्तव्य योग्य नाही, त्यांना…”; लेखिका तस्लिमा नसरीन यांचं परखड मत काय?
तस्लिमान नसरीन यांनी सलमान खान, शाहरुख खान, जावेद अख्तर यांची उदाहरणं देत रहमान यांच्यावर टीका केली आहे.
संगीतकार ए. आर. रहमान हे विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘छावा’ हा चित्रपट फूट पाडणारा चित्रपट असल्याचे म्हटलं. मात्र, आपण केवळ कला आणि संगीतासाठी हा चित्रपट स्वीकारल्याचे त्यांनी म्हटलं. ज्यानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत. आता लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या तस्लिमा नसरीन यांनीही ए. आर. रहमान यांच्या या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हटलं आहे तस्लिमा नसरीन यांनी?
ए. आर. रहमान ही तक्रार करत आहेत की त्यांना मुस्लिम असल्याने हिंदी चित्रपटसृष्टीत काम मिळत नाही पण शाहरुख खान आजही बॉलिवूडचा बादशाह आहे. सलमान खान, आमिर खान, जावेद अख्तर, शबाना आझामी हे सगळे सुपरस्टार आहेत. प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यक्तींना कधीही अडचणी येत नाहीत त्यांचा धर्म कुठलाही असो. असं तस्लिमा नसरीन म्हणाल्या.
अडचणी गरीबांना येतात, श्रीमंतांना नाही-तस्लिमा नसरीन
पुढे तस्लिमा म्हणाल्या, “अचडणी कायम गरीब व्यक्तींना येतात. मी नास्तिक आहे, पक्की नास्तिक. माझ्या नावामुळे मला मुस्लिम आहे ही असं ओळखलं जातं. जे मुस्लिम विरोधी आहेत ते समोरची व्यक्ती आस्तिक आहे की नास्तिक हे बघत नाहीत. मी नास्तिक आहे म्हणून हैदराबादमध्ये मला मारहाण झाली. रुग्णालयात माझी फसवणूक झाली. मला घर भाडे तत्त्वावर मिळत नाही. छत्रपती संभाजी नगरमध्ये मला प्रवेश नाही. बंगालमधून मला हाकलून देण्यात आलं. या समस्या ए. आर. रहमान किंवा बॉलिवूडच्या मुस्लिम स्टार मंडळीना सहन कराव्या लागत नाहीत. “
रहमान यांचा आदर सगळेच करतात त्यांनी असं बोलणं…
तस्लिमा म्हणतात, ए. आर. रहमान यांचा आदर हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, नास्तिक सगळेच सगळेच जण करतात. त्यांनी अशा पद्धतीने बोलणं त्यांना शोभत नाही. मी भारतीय नागरिक नाही. पण मी इथे राहते कारण माझं भारतावर प्रेम आहे. इस्लाम नावाची पोकळ हाडं फोडून आणि धर्म चिरुन झाल्यानंतर मी निर्वासित म्हणून आयुष्य जगते आहे. तरीही लोक मला म्हणतात तू चंद्रकोर पाहून ईद साजरी करतेस, तुमच्या धर्मामध्ये बहुपत्नीत्व मान्य आहे. या देशात लोकांना नास्तिकता किंवा माणुसकी याबाबत फार माहिती नाही.
रहमान यांचं स्पष्टीकरण काय?
याबाबत ५९ वर्षीय रहमान यांनी रविवारी इन्स्टाग्रामवर आपली भूमिका मांडताना नमूद केले की, “हेतूंबद्दल कधीकधी गैरसमज होऊ शकतात हे मी समजू शकतो. पण माझा उद्देश नेहमीच संगीताच्या माध्यमातून प्रगती, गौरव आणि सेवा करण्याचा राहिला आहे. मी कधीही कोणालाही वेदना देण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्या प्रामाणिकपणाविषयी शंका नसेल अशी मला आशा आहे