सुप्रिया सुळेंकडून प्रफुल्ल पटेल,सुनील तटकरेची हकालपटी तर अजित पवारांकडून जयंत पाटलांची हकालपट्टी.

राष्ट्रवादी काँग्रेस मधील राजकीय युद्ध चांगलेच पेटले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे दुसरे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व सरचिटणीस सुनील तटकरे यांची हकालपट्टी केल्याचे जाहीर करतात अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची नियुक्ती केली आहे.यासोबतच आमदार अनिल पाटील यांची विधानमंडळातील प्रतोद म्हणून निवड केली आहे.

दरम्यान शरद पवार गटाकडून अजित पवार यांच्या गटाला काही नोटीस बजावल्या असून शरद पवार गटाला अश्या कोणत्याही नोटीस बजावण्याचा अधिकार नसल्याचे सांगून आम्हीच खरी राष्ट्रवादी असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

यावेळी तुमच्या राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण असा प्रश्न पत्रकाराने विचारताच शरद पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
एकाच वेळी दोन्ही राष्ट्रवादीचा अध्यक्ष होण्याचा बहुमान शरद पवारांना मिळाल्याचे दिसत आहे.

Leave a Reply