सुषमा अंधारे यांच्या कानाखाली जाळ काढणाऱ्या शिवसैनिकाची हकालपट्टी!

सुषमा अंधारे यांची शिवसैनिकांकडूनच वसुली: जाधव

बीड:ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या कानाखाली जाळ काढणाऱ्या जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांचेही पद काढून घेण्यात आले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून त्या सतत वादग्रस्त ठरल्या आहेत.सुषमा अंधारे या हिंदू देवी देवतांवर टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. शिवसेनेत येण्यापूर्वी हिंदू धर्मातील देवी देवतांवर त्यांनी खालच्या भाषेत टीका केली होती. काल बीड मधे जिल्हाप्रमुख जाधव यांनी अंधारे शिवसैनिकाकडून पैसे उकळतात हा आरोप करून त्यांनी सुषमा अंधारेंच्या कानाखाली दोन चापटा बसवल्या. या घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून आप्पासाहेब जाधव व संपर्क प्रमुख धोंडू पाटील यांची हकालपट्टी केल्याचे पक्षाने जाहीर केले आहे.

 

सुषमा अंधारे शिवसैनिकांकडून पैसे उकळतात :

आप्पासाहेब जाधव यांचा आरोप

स्वतः ला शिवसेनेचे उपनेत्या म्हणून घेणाऱ्या व फुले, शाहू,आंबेडकर, संविधान, लोकशाही चा सतत जप करणाऱ्या सुषमा अंधारे या शिवसैनिकाकडूनच पैसे उकळत आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये एसी बसवणे, सोफा बसवणे यासाठी शिवसैनिकाकडून त्या पैसे मागत होत्या. हा प्रकार माझ्या कानावर आला होता. तसेच माझे पद इतरांना देण्यासाठी डील करू पाहत होत्या. यामुळे या वरून काल आमच्यात बाचाबाची झाली व मला त्यांच्यावर हात उचलावा लागला. असे हकलपट्टी केलेले जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जाधव यांनी एका व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून सांगितले आहे.

Maha jagran mahajagran maha jagran

Leave a Reply