शेतकरी बंधुंनो ट्रॅक्टर खरेदी अनुदान योजनेचा लाभ घेऊन करा मजूर टंचाई वर मात!

Rajya Krushi Yantrikikaran Yojna 2023 :

राज्य कृषियांत्रिकीकरण योजना

Tractor Scheme Tractor Anudan Yojna महाराष्ट्रात येत्या जून पासून खरिप हंगाम (Kharif Season) सुरू होणार आहे. त्यामुळे शेतीच्या मान्सून पूर्व कामांसाठीची शेतकऱ्यांची आतापासूनच लगबग सुरू होईल. परंतु,दिवसेंदिवस शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी मजूर टंचाई (Labor Shortage) जाणवत आहे. शेतीत काम करण्यास मजूर तयार नाहीत. स्थानिक चे मजूर सहा महिने ऊस तोडीसाठी जातात. त्यानंतर मात्र सहा महिने ते काम करण्यास राजी नसतात. परिणामी शेतातील कामासाठी मजूर मिळणे अवघड झाले आहे. मजूर मिळालेच तरी त्यांची मजूरी शेतकऱ्यांना परवडत नाही. अशा कोंडीत सापडलेले शेतकरी आता कृषी यांत्रिकिकरणाचा (Agriculture Mechanization) आधार घेत आहेत. शेतकऱ्यांची ही गरज ओळखून कृषी यांत्रिकिकरणासाठी सरकारही शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. सरकार कृषी यांत्रिकिकरणाच्या अनेक योजना राबवत आहे. ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान ही त्यातलीच एक योजना होय! या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या खरेदीवर तसेच ट्रॅक्टर चलीत औजारे जसे की पेरणी यंत्र नांगरणी यंत्र, मोगडणी यंत्र व तत्सम औजार खरेदीसाठी अनुदान देत आहे.

 

केंद्र सरकार आणि राज्य सरकार पुरस्कृत योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येतात. यात केंद्र सरकार ६० टक्के व राज्य सरकार ४० टक्के मिळून शेतकऱ्यांना अनुदान देतात. राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करता यावा व या माध्यमातून शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या मजूर टंचाई वर उपाय निघावा या उद्देशाने सरकार ही योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करू शकतो किंवा ज्या शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर पूर्वीपासूनच आहे, ते शेतकरी ट्रॅक्टर चलित अवजारे खरेदी करण्यासाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेअंतर्गत २ डब्ल्यू डी आणि ४ डब्ल्यू डी हे दोन प्रकार आहेत. यामध्ये ८ एच पी ते ७० एच पी क्षमतेचे ट्रॅक्टर साठी अर्ज करता येऊ शकतो.या योजनेसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या किमतीची २० टक्के इतके अनुदान मिळते.

 

ट्रॅक्टर योजनेचा किंवा ट्रॅक्टर चलीत अवजारे या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक शेतकऱ्यांना खाली दिलेल्या निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे. या निकषांची पूर्तता केल्यानंतरच शेतकरी अनुदानाचा लाभ मिळवू शकतात.

 

योजनेसाठी आवश्यक पात्रता –

 

१)शेतकऱ्याने यापूर्वी कोणताही ट्रॅक्टर खरेदी केलेला नसावा.

 

२)शेतकऱ्याकडे शेतीयोग्य जमीन असावी.

 

३) छोटे व अल्पभूधारक शेतकरी असावा.

 

४)या योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा.

 

५)एका कुटुंबातील केवळ एकच व्यक्ती योजनेसाठी अर्ज करू शकते.

 

६)या योजनेंतर्गत शेतकरी फक्त एक ट्रॅक्टर अनुदानासाठी पात्र आहे.

 

आवश्यक कागदपत्रे –

 

१)आधार कार्ड

 

२)रेशन कार्ड

 

३)रहिवाशी दाखला

 

४)उत्पन्नाचा दाखला

 

५)पॅन कार्ड

 

६)बँक पासबुक

७)ड्रायव्हींग लायसन्स (गाडी चालविण्याचा परवाना)

 

८)सातबारा उतारा व ८ अ उतारा

९) शेतकरी अनुसूचित जाती किंवा जमाती चा असेल तर जातीचा दाखला.

१०) या योजने अंतर्गत ट्रॅक्टर चलीत अवजारे घ्यायचे असतील तर ट्रॅक्टर असल्याबाबतचा पुरावा.

मोबाईल क्रमांक

 

येथे करा अर्ज –

कृषी अभियांत्रिकी योजनेअंतर्गत ट्रॅक्टर किंवा ट्रॅक्टरचलित अवजारांचा लाभ घेण्यासाठी Mahadbt महाडीबीटी या शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. आपण या पोर्टलवर नवीन असाल तर सर्वप्रथम मोबाईल नंबर व ईमेलच्या आधारे नोंदणी करून घ्या. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आपल्या कागदपत्रानुसार आपली संपूर्ण प्रोफाइल तयार करून घ्या. त्यानंतर आपणास हवी असणारी योजना निवडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करा. ऑनलाइन लॉटरीमध्ये तुमचा नंबर लागल्यास तुम्हाला तसे शासनाकडून कळवले जाईल यानंतर तुम्ही तुमची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करू शकता. आपल्या सोयीसाठी खाली लिंक देत आहोत.

https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login

शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन सरकारी योजना, नोकरी अपडेट व रोखठोक बातम्यांसाठी वाचत रहा महा जागरण न्यूज पोर्टल. आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये अवश्य सामील व्हा, लिंक 👇

https://chat.whatsapp.com/EtVPNaxyHO7Lr7mw1Ijrkv

Leave a Reply