मुलाच्या दुचाकीसाठी आईने भीक मागून गोळा केली ८० हजारांची चिल्लर

 

पश्चिम बंगाल, ऑनलाईन : मुलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई-वडील अफाट कष्ट उपसत असतात. दिवसरात्र मेहनत घेतात, जेणे करून मुलांच्या स्वप्नांना बळ मिळेल. पश्चिम बंगालमधील नदीया जिल्ह्यात एका आईने चक्क भीक मागून मुलासाठी दुचाकी खरेदी करण्यासाठी एक मोठी रक्कम गोळा केली आहे. (Video)

त्या मुलाने आईन भीक मागून गोळा केलेली चिल्लर बादलीत भरून जवळच्या शोरूममध्ये पोहचला. ही चिल्लर पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.मुलाने आपल्या आईला दुचाकी खरेदी करण्याची स्वप्न असल्याचे सांगितले. तर आईने मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ८० हजारांची चिल्लर गोळा केली.

यापूर्वी अशीच एक घटना केरळमध्ये समोर आलेली होती. या प्रकरणात संबंधित मुलगा हा दुचाकी खरेदी करण्यासाठी लाखो रुपयांची चिल्लर घेऊन शोरूमला पोहचला होता. राकेश पांडे असे या मुलाचे नाव होते. त्याने सांगितले की, “माझी भीक मागून उदर निर्वाह चालवते. आईने ही ८० हजारांची रक्कम चिल्लर स्वरुपात गोळा केली आहे”, अशी माहिती राकेश पांडेने दिली आहे. (Video)

दुचाकी शोरूमने राकेश पांडेला ८० हजारांची चिल्लर घेऊन त्याला दुचाकी विकत दिलेली आहे. या बातमीचा व्हिडिओ एका वृत्तसंकेत स्थळाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिलेली आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहे. समिश्र प्रतिक्रियादेखील सोशल मीडियावरून उमटत आहेत.

[ad_2]

Source link

Leave a Reply