Vijay Wadettiwar : ”राज्य सरकारला गुजराती लोकांची हुजरेगिरी करायची आहे”

मुंबईतल्या प्रकारानंतर वडेट्टीवार आक्रमक

मुंबईः “सरकारला गुजराती लोकांची हुजरेगिरी करायची आहे” या शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाना साधला आहे.महाराष्ट्रीयन लोकांना सोसायटीमध्ये प्रवेश नसल्याचे कारण देत एका गुजराती व्यक्तीने महिलेला धक्काबुक्की केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी श्री. वडेट्टीवार यांनी केली आहे.

या बाबत पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले, मराठी माणसाच्या संदर्भात दादागिरी सुरू आहे. सरकारने मुंबईमधून मराठी माणसाला हकालण्याचा विडा उचलला आहे. सरकारला गुजराती लोकांची हुजरेगिरी करायची असून ही दादागिरी निषेधार्ह आहे. सरकारमधील माणसांमध्ये मराठी अस्मिता असेल दोषीला अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.

त्रृप्ती देवरुखकर या महिलेने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.सदर महिला ऑफिस शोधण्यासाठी मुंबईतल्या मुलुंड पश्चिम या भागात गेली होती. ऑलनाईल पत्ता मिळाल्यानंतर महिला शिवसदन सोसायटीमध्ये गेली होती. त्यावर येथे महाराष्ट्रीयन लोकांना परवानगी नसल्याचे महिलेला सांगण्यात आले होते.

नागपूरमध्ये बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, बाप्पा ने जाताना सरकारला सद्बुद्धी द्यावी ही प्रार्थना आहे. मला सकाळी एका बुलढाण्यातील शेतकऱ्याचा कॉल आला त्याने मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगितलं. सरकारकडून मदत मिळत नसल्याचं त्याने म्हटलं.

Leave a Reply