ईदच्या दिवशी पाकिस्तान हादरले.मशिदीतील स्फोटात 52 ठार

पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला असून या स्फोटात 52 लोकांचा मृत्यू झाला असून शंभर पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले आहेत.ईद निमित्त येथील एका मशिदीत नमाज पठण करण्यासाठी भाविक एकत्र आले असताना अचानक मोठा स्फोट झाल्याने 52 लोकांचा यात मृत्यू झाला आहे. दोनशेहून पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत दरम्यान बलुचिस्तान प्रांतात सर्वत्र आणीबाणी लावण्यात आली आहे.दुसरा बॉम्बस्फोट खैबर पखतुन भागातील मशिदीत झाला असून यात पन्नास पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.

Leave a Reply