मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांच्या संपत्तीवर जावई, नातवांचा हक्क ; न्यायालयाचा महत्‍वपूर्ण निकाल

 

नवी दिल्ली; वृत्तसेवा मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांच्या संपत्तीवर जावई आणि नातवांचा हक्क असेल, असा महत्वापूर्व निकाल दिल्लीतील साकेत न्यायालयाने सुनावला आहे. एका प्रकरणाची सुनावणी करतांना न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत मालमत्तेची विक्री अथवा इतर कुठलाही अधिकार दुसऱ्या पक्षाला देण्यास स्थगिती दिली आहे.

संपत्तीच्या वादातून भाच्याने त्याच्या दोन मामांविरोधात याचिका दाखल केली होती. यासंबंधी सुनावणी घेत साकेतमधील न्यायमूर्ती नरेश कुमार लाकर यांच्या न्यायालयाने सुनावणी घेत हा आदेश दिला आहे. आजोबांच्या संपत्तीत मामाने हक्क दिला नसल्याचा आरोप याचिकेतून लावण्यात आला होता.

जर मुलीचा मृत्यू झाला, तर वडिलांच्या संपत्तीमध्ये जावई आणि नातवांचा हक्क असेल. या प्रकरणात जोपर्यंत संपत्तीतील हिस्सा निश्चित होत नाही तोपर्यंत दुसरा पक्ष तिची विक्री करू शकत नाही, असे न्यायालयाने आदेशातून स्पष्ट केले. याचिका करणाऱ्याची आई ही तिच्या वडिलांच्या संपत्तीची वारसदार होती. याचिका करणाऱ्याचाही त्या संपत्तीमधील एक तृतीयांश भागावर हक्क होता. त्याचबरोबर या प्रकरणाच्या पुढील तारखेपर्यंत संबंधित कार्यालयाने सर्व मालमत्तांचे मूल्यांकन करावे असे निर्देश देत न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत मालमत्तेच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

Source link

Leave a Reply