श्री क्षेत्र कपिलधार मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण तीर्थस्थान –दीपक केसरकर

बीड : आपले राज्य हे शेतकऱ्याच, समाज सुधारकांच संत परंपरेचे राज्य आहे. या भूमित अनेक महान संत होवून गेले. वीरशैव समाजाचे संत मन्मथ स्वामी एक महान संत होते. त्यांचे मराठवाडा आणि आसपासच्या राज्यात असलेला प्रभाव बघून मी धन्य झालो, श्री क्षेत्र कपिलधार हे एक महत्त्वपूर्ण तीर्थस्थान असल्याची, भावना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी तीर्थक्षेत्र कपिलधार येथील जाहीर कार्यक्रमात व्यक्त केली.

रविवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेनिमित्त वीरशैव लिंगायत समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीश्रेत्र कपिलधार येथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे प्रतिनिधी म्हणून संत शिरोमणी मन्मथ स्वामी माऊली यांच्या संजीवन समाधीची शासकीय महापूजा शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच राज्याचे कृषि मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते सायंकाळी 4 वाजता झाली. त्यानंतर अखिल भारतीय शिवा संघटनेच्या वतीने आयोजित 28 व्या राज्यव्यापी मेळाव्यात संबोधित करतांना श्री. केसरकर बोलत होते.

दरवर्षी कार्तिक पोर्णिमे निमित्त श्री श्रेत्र कपिलधार येथे यात्रोत्स्वाचे आयोजन केले जाते. या निमित्त शासकीय महापूजा ही मागील 22 वर्षापासून होत आहे. यावर्षी शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे प्रतिनिधी म्हणून शालेय शिक्षणमंत्री श्री. दीपक केसरकर आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या शासकीय महापूजेला वीरशैव लिंगायत समाजाचे शिवाचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांच्यासह यावेळी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे तसेच असंख्य भाविक उपस्थित होते. या महापूजेनंतर आयोजित मेळाव्यात श्री. केसरकर संबोधित करतांना ते पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आपल्या शुभेच्छा पाठविल्या असून ते लवकरच मन्मथ स्वामीच्या समाधीला भेट देतील. बीड जिल्हयातील  कपिलधार हे महत्वाचे तीर्थश्रेत्र असून या ठिकाणी आवश्यक तो निधी दिला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

शिक्षण खात्याचा मंत्री या नात्याने कौशल्य विकासावर भर दिला जात असून अधिकाधिक तरुणांनी कौशल्य प्रशिक्षण घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यासह पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये तिसऱ्या वर्गापासून कृषि हा विषय शिकविला जाईल असेही ते यावेळी म्हणाले.

बळीराजाच संकट दूर होवो श्रीश्रेत्र कपिलधारा येथे साकड – कृषि मंत्री धनंजय मुंडे

बळीराजाच संकट दूर होवो अस साकड श्री श्रेत्र कपिलधारा येथील महापूजेला केले असल्याचे  कृषि मंत्री श्री. मुंडे यांनी उपस्थित भाविकांना सांगितले.

पालकमंत्री श्री. मुंडे पुढे म्हणाले, बीड जिल्हामध्ये ऐकीकडी परळी वैद्यनाथ येथे जोर्तिलिंग आहे. तर श्रीश्रेत्र कपिलधारा येथे मन्मथ स्वामीची समाधी आहे. असा सुवर्ण अध्यात्मिक  योग बीड जिल्ह्याला लाभला आहे.  आपण सर्वजण त्याचे पाईक आहोत, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. दि. माजी मुख्मंत्री विलासराव देशमुख आणि दि. केद्रीय मंत्री गोपिनाथ मुंडे  यांच्यामुळे येथे शासकीय पुजा सुरु झाल्याची आठवणही त्यांनी यावेळी केली.

ते पुढे म्हणाले बीड जिल्ह्यासाठी 100 कोटीचा आराखडा मंजूर करण्यात आला असून त्यापैकी 11 कोटी जिल्ह्याला मिळालेले आहेत. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी करुन उर्वरित निधी दिला जाईल.

बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ सुरु करण्याचे मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. श्रीश्रेत्र कपिलधार येथे येणाऱ्या पालख्या, दिंडी यांची निट व्यवस्था व्हावी यासाठी  प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी यावेळी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचा वीरशैव समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीश्रेत्र कपिलधारा येथे उपस्थित सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या तसेच लवकर संत मन्मथ स्वामीचे दर्शन घेण्याचे वचनही दिले.

या मेळाव्याचे प्रास्ताविक शिवा संघटनेचे अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी केले. या कार्यक्रमात मान्यवर मंडळी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply