कपाळी कुंकवाचा टिळा अन् हाती मंगल कलश; आमिरची पुजा पाहून नेटकरी म्हणाले…

मुंबई: हिंदुत्ववादी लोकांनी चालवलेल्या बॉयकॉट मोहिमेमुळे(#Boycottlalsingchaddha) बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुरता अपयशी ठरला.त्याच्यासाठी हा मोठा धक्का होता. असा धक्का पुन्हा-पुन्हा बसू नये म्हणून आमिरने आता ताकही फुंकून प्यायचे ठरवलेले दिसते. त्याचा नवा लूक आणि हिंदु धर्म पद्धतीनं केलेली पूजा त्याचीच तर साक्ष देतेय…

आमिर खान आपल्या चित्रपटातून हिंदु धर्म, संस्कृती व देव देवता यांची टिंगल उडवतो. निंदा नालस्ती करतो. लव्ह जिहाद, धर्मांतरण या गोष्टींना प्रोत्साहन देतो. असा आरोप त्याच्या विरुध्द हिंदुत्ववादी संघटना कडून होताना दिसतो. केवळ आमिरच नव्हे तर एकूण बॉलीवूडमध्ये हिंदु धर्म, संस्कृती चा दुस्वास करून मुघलांचा खोटा अवाजवी इतिहास लोकांच्या माथी मारल्या जातो. त्याचाच परिणाम म्हणून आमिरचा ‘लाल सिंह चढ्ढा’ प्रदर्शित होण्यापूर्वीच सोशल मीडिया वर बॉयकॉट मोहिम सक्रिय झाली होती.

#Boycottlalsinhchaddha #boycottamirkhan असे हॅशटॅग वापरून चित्रपट पाहू नका असे आवाहन करण्यात येत होते. काही लोकांनी तर चित्रपट गृहाच्या बाहेर उभा राहून लाऊड स्पीकर द्वारे जाहीर आवाहन केल्याचे अनेक व्हिडिओ त्याकाळात पहायला मिळाले. त्यामुळे चित्रपट सुपर फ्लॉप होणार हे प्रदर्शित होण्यापूर्वीच दिसत होते. आमिर खानने प्रेक्षकांनी चित्रपट बॉयकॉट करू नये, अशी विनंती करूनही शेवटी लाल सिंह चढ्ढा सपशेल आपटला! हे बॉयकॉट मोहिमेचे यश आहे, असा सूर नेटकरांनी सोशल मीडियावर लावून धरला होता. या घटने पासून बॉलीवूड मधील अनेक नट नट्यानी योग्य ‘तो’ घेतल्याचे दिसते. आमिर खान चा नवा लूक आणी पूजा-अर्चा त्याचेच द्योतक आहे, असे नेटकरी बोलत आहेत.


‘लाल सिंह चड्ढा’चे दिग्दर्शक अद्वैत चंदन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आमिरचे काही फोटो शेअर केले आहेत.

https://www.instagram.com/p/Cl6X-2VohvJ/?igshid=YmMyMTA2M2Y=

या फोटोत आमिर त्याच्या आमिर खान प्रॉडक्शन हाऊसमध्ये पूजा करताना दिसतोय. आमिरबरोबर त्याची पूर्वाश्रमीची पत्नीही आहे.डोक्यावर पांढऱ्या रंगाची टोपी, कपाळावर कुंकवाचा टिळा, उपरणं, हातात कलश घेऊन आमिर पूजा करत आहे. शिवाय पूजा केल्यानंतर आमिर त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीबरोबर आरतीही करताना दिसत आहे. अगदी पारंपरिक हिंदु धर्माच्या पद्धतीने आमिरने त्याच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये पूजा केली आहे.


मुंबईमध्ये आमिरने त्याच्या प्रॉडक्शन हाऊससाठी नवी जागा घेतलीय.तेथे ही पूजा आयोजित केली होती. या पूजेला आमिर खान प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी ही उपस्थित होते.सध्या आमिरने केलेल्या या पारंपरिक पूजेची व त्याच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसत आहे.

Leave a Reply