मुंबई पोलिसांकडून उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी सुरू

मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबियांनी बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याची तक्रार गौरी भिडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून केली होती. त्याची दखल घेत प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती सरकारी वकिलांनी हायकोर्टात दिली आहे.

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात गौरी भिडे व त्यांच्या वडिलांनी दाखल केली होती.या याचिकेवर सुनावणी पार पडली आहे. उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेची प्राथमिक चौकशी मुंबई पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. पीओडब्लु याबाबत चौकशी करत आहे. गौरी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार केली आहे. त्यात उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत रीतसर चौकशीची मागणी करणारे पत्र आमच्याकडे आले आणि आम्ही प्राथमिक चौकशी सुरू केली असल्याची माहिती राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे. हायकोर्टाने याची नोंद घेतली आहे.
दरम्यान, गौरी भिडे यांची याचिका सुनावणीसाठी घ्यायची की नाही यासंदर्भातला निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. याशिवाय उद्धव ठाकरे यांनी या याचिकेवर आक्षेप घेत ही याचिका राजकीय वैमनस्यातून दाखल केली असल्याचा आरोप केला आहे. यासंबधी न्यायालय काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष्य लागले आहे. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीची चौकशी सुरू केली असुन, चौकशीत काही निष्पन्न झाले तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप कडून हा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो. असे झाले तर ते उद्धव ठाकरे यांना अडचणीचे ठरू शकते. भाजपा ने उद्धव ठाकरे यांच्याशी काडीमोड घेतल्यापासून मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना आखायला सुरुवात केली आहे.

याचिकेत काय म्हटले आहे?
प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचे नेमकं स्त्रोत काय?
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना कोरोना काळात सामना वृत्तपत्राचा टर्नओव्हर 42 कोटी रुपये होता, तर साडे अकरा कोटी रुपये नफा कसा झाला?
ठाकरे कुटुंबाच्या उत्पन्नाच्या स्त्रोताची चौकशी व्हावी, अशी मागणी गौरी भिडे या याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात केली होती.

Leave a Reply