‘अभाविप’च्या राष्ट्रीय मंत्रिपदी अंकिता पवार यांची निवड

बीड: (प्रतिनिधी): ABVP News देशातील सर्वात मोठी विद्यार्थ्यांची संघटना असणारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या राष्ट्रीय मंत्रिपदी अंकिता पवार यांची निवड करण्यात आली आहे.

अंकिता पवार यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडवलेले आहेत. हि निवड आपल्या कामाची पावती असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.अंकिता पवार मूळच्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील कार्यकर्त्या आहेत. त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य ,प्रदेश सहमंत्री, प्रदेश मंत्री अशा विविध दायित्वचे निर्वाहन केलेले आहे. काल जयपूर येथील राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय मंत्रिपदी अंकिता पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. नविन दायित्वा बद्दल त्यांचें सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply