सुरेखा पुणेकर यांनी सोडला…

मुंबई:प्रतिनिधी

अश्लील हातवारे करीत अपुऱ्या कपड्यात केलेल्या डान्स व्हिडीओमुळे आज गौतमी पाटील चर्चेचा विषय ठरत आहे. डान्स दरम्यान केलेलं अंगविक्षेप यामुळे गौतमीचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत.यावरून एकेकाळची लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी गौतमी पाटीलच्या दिशेने टीकेचा बान सोडला आहे.

सुरेखा पुणेकर यांनी माध्यमांशी बोलतांना अप्रत्यक्षरित्या गौतमी पाटीलवर नेम धरून बान सोडला.सुरेखा पुणेकर म्हणाल्या, ‘जी लावणीसम्राज्ञी अंगविक्षेप करुन आपली कला सादर करते तिला लोकं सोडणार नाही. ज्या लावणी सम्राज्ञीकडे कला आहे, तिला प्रोत्साहन द्या. अपुरे कपडे घालणे आणि अश्लील हातवारे करीत नाचणे याला लावणी म्हणता येणार नाही.लावणीला योग्य प्रकारे सादर गेले केले पाहिजे. नाहीतर महिला स्टेजवर जाऊन मारतील. जी कलाकार चांगली आहे, तिला नक्कीच तुम्ही डोक्यावर घ्या, तिला प्रोत्साहन द्या. पण जी अश्लील वर्तन करते, जी अपुरे कपडे घालते, तिला तुम्ही समाजात अजिबातच स्थान देऊ नका. नाहीतर महाराष्ट्राचा देखील बिहार होईल.’ असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

काही काळापूर्वी सुरेखा पुणेकर यांच्या लावण्याचे कार्यक्रम हाऊस फुल्ल होत असत. विशेष म्हणजे त्यांच्या कार्यक्रमास महिला सुद्धा उपस्थित राहू शकत.

Leave a Reply