इस प्यार से मेरी तरफ ना देखो…

मुंबई,( प्रतिनिधी): इस प्यार से मेरी तरफ ना देखो, प्यार हो जाएगा… हे चित्रपटात ऐकायला छान वाटत असले तरी प्रत्यक्षात मात्र तसे करायला जाल तर… सावधान! तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते.

भारतामध्ये अनेक कायदे असे आहेत जे ऐकून आपल्याला गंमत वाटू शकते. तसेच काही कायदे कालबाह्यही झालेले आहेत नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून अशा बहुतांश कालबाह्य कायद्यांना बाहेरची वाट दाखवलेली आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याकडून अनेकदा छोट्या मोठ्या कायद्याचे उल्लंघन होते. बऱ्याच वेळा तर आपली एखादी कृती हा गुन्हा आहे हेच आपल्याला माहिती नसते.

टुकुर टूकुर देखते हो क्या..?

रस्त्याने चालताना महिलांचे सौंदर्य न्याहाळणे हि बाब आपणास सामान्य वाटू शकते परंतू एखाद्याच्या या कृतीवर महिलेने आक्षेप घेतला तर मग तुमचे काही खरे नाही असे समजा! एखादया मुलीकडे किंवा महिलेकडे १४ सेकंदांपेक्षा जास्त वेळ पाहणे भारतीय कायद्यानुसार गुन्हा आहे.जाणूनबुजून किंवा नकळत, थट्टामस्करी करताना, कामाच्या ठिकाणी महिला, मैत्रिणी आणि महिला सहकाऱ्यासोबत अशी कृत्ये करणे हा भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ आणि कलम ५०९ नुसार गंभीर गुन्हा मानला जातो.

अशी सर्व प्रकरणे ‘छेडछाड’ (eve teasing) अंतर्गत येतात. त्यामुळे आता मुलींकडे १४ सेकंद पाहणे देखील गुन्ह्याच्या श्रेणीत आले आहे. सार्वजनिक आणि खासगी आयुष्यात अनेकदा मुलांनी मुलींकडे एकटक पाहणे किंवा पाठलाग करणे अशा घटना घडतात. केरळमध्ये २०१६ मध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात आली. या तरतुदीनुसार कोणत्याही मुलीकडे १४ सेकंदांपेक्षा जास्त वेळ टक लावून पाहणे देखील गुन्हा आहे.भारतीय दंड संहिता (IPC) कलमांतर्गत, महिला किंवा तरुणीविरुद्ध अश्लील कृत्ये, अश्लील हावभाव किंवा अश्लील शेरेबाजी करणाऱ्यांना एक वर्षांपर्यंत सश्रम कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

Leave a Reply