पालकमंत्री साहेब…धारूर- वडवणी तालुका पाकिस्तान मध्ये येतो काय?

धारूर- वडवणी तालुका अतिवृष्टी नुकसान भरपाईतून वगळल्याने दत्ता वाकसेंचा संतप्त सवाल

बीड:प्रतिनिधी

सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यामध्ये पावसाने थैमान घातले होते बीड जिल्ह्यातील साडे आठ लाख शेतकऱ्यांचे पाच लाख ८६ हजार हेक्टरांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात माजलगाव मतदार संघातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी ४१० कोटी रुपयांचा निधी प्रशासनाके वर्ग केला आहे. प्रशासनाने यात माजलगाव मतदार संघातील धारुर व वडवणी तालुका वगळला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेले शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, माजलगाव वडवणी या दोन्ही तालुक्यांचा मदतीत समावेश करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी का वडवणी धारूर तालुका पालकमंत्री साहेब पाकिस्तान मध्ये येतो काय.? असा सवाल करत शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे व्हाईस प्रेसिडेंट दत्ता वाकसे यांनी प्रसिद्धीस पत्रक दिला आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जर का आठ दिवसाच्या आत या दोन्ही वडवणी व धारूर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी एकही रुपया देण्यात आला नाही हे मात्र या दोन्हीही तालुक्यातील शेतकऱ्याचे दुर्दैवच म्हणावे लागेल सध्या परिस्थिती पाहता बळीराजा अतिशय मेटाकोटीला आलेला असून कापसाचे अतोनात नुकसान झालेला आहे सोयाबीनचे नुकसान झालेले आहे मात्र त्यांना नुकसान भरपाई पासून वगळल्यामुळे बळीराजा मात्र आता अतिशय त्रस्त झालेला आहे त्यामुळे तात्काळ प्रशासनाने व पालकमंत्र्यांनी लक्ष घालून या दोन्ही तालुक्याचा तात्काळ अनुदानाच्या यादीमध्ये समाविष्ट करून या दोन्हीही तालुक्याला नुकसान भरपाई पोटी तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी बळीराजा त्रस्त होतोय हे मात्र यांना जाणवताना दिसत नाही काय असा देखील सवाल केला आहे तात्काळ या दोन्हीही तालुक्याला भरीव असे नुकसान भरपाईचे अनुदान देऊन शेतकऱ्याला न्याय द्यावा माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी देखील तात्काळ वडवणी धारूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान का दिले नाही हा जॉब विचारावा आपण लोकप्रतिनिधी आहात या उद्देशाने तात्काळ या दोन्हीही तालुक्याला भरीवासा निधी उपलब्ध करून देऊन शेतकऱ्याला आनंद द्यावा अन्यथा असे न केल्यास शासनाला धडा शिकवण्यासाठी भीक मागवा आंदोलन करून शेतकऱ्याकडून भीक जमा करून आम्ही महाराष्ट्र सरकार व पालकमंत्र्यांना देऊ त्यामुळे तात्काळ आठ दिवसाच्या आत धारूर वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी तात्काळ नुकसान भरपाई अनुदान त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करावे असे न केल्यास भिक मागवा आंदोलन करून सरकारला भीक देणार असल्याचे शेतकरी पुत्र तथा शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल संघटनेचे व्हाईस प्रेसिडेंट दत्ता वाकसे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply