अजित पवार यांनी काल भाजप-सेना सरकारला पाठिंबा देऊन काल मंत्रिपदाची शपथ ही घेतली यावेळी अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आज प्रसार माध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पक्ष आगामी लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक पातळीवरील निवडणुका शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी (अजित पवार ) सोबत युती करून लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रशेखर बावनकुळे व अजित पवारांनी जरी युतीचे संकेत दिले असले तरी जिथे ज्या पक्षाचा आमदार तिथे त्या पक्षाला जागा सुटणार का?नवीन फॉर्म्युला स्वीकारून निवडणुकांना सामोरे जाणार या बाबत प्रश्नचिन्ह आहे.
दरम्यान कालच्या राजकीय भूकंपा नंतर भाजप व शिवसेनेकडून विधानसभेसाठी बाशिंग घालून निवडणुकीच्या तयारीत असलेल्या इच्छुकांच्या पाया खालची वाळू सरकली असल्याचे दिसत आहे.