अशोक डकांचा तातडीने राजीनामा का?

मुंबई-मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी आज तातडीने राजीनामा दिला आहे. कालच ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या स्वतःच्या गावात त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने अशोक डकांच्या कार्यक्षमतेविषयी राष्ट्रवादी पक्षात प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यातच आज त्यांनी तातडीने राजीनामा दिल्याने त्यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिला का त्यांना राजीनामा द्यायला लावला अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Leave a Reply